शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडवा

By admin | Updated: April 21, 2017 01:35 IST

स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण पुढे येतात. अशा या स्पर्धएच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तीमत्व घडविण्याचे

सुरेश कदम : जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धागोरेगाव : स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण पुढे येतात. अशा या स्पर्धएच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तीमत्व घडविण्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी केले. सहयोग शिक्षक मंचच्यावतीने येथील शहीद जाम्या-तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या पुस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.पी. शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कल्याण डहाट उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलादर डहाट यांनी, विद्यार्थ्यांसाठी संधीचे सोने करण्याचे कसब अवगत कसे करता येईल यावर मार्गदर्शन कले. प्राचार्य शेख यांनी, सहयोग शिक्षक मंचाद्वारे आयोजित कार्यक्रमाचा हेवा वाटतो. असे कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात व्हावे, सामाजिक बांधिलकी जोपासत एक मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्याचे सत्कार कार्यक्रम असो वा शिक्षण साहित्य संवाद, निबंध, वक्तृत्व स्पर्धा असो मंचाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत मांडले.जिल्ह्यातील २४० विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला. दोन गटात विभागलेल्या निबंध स्पर्धेत वर्ग ५ ते ८ साठी ‘माझ्या स्वप्नातील गाव’, ‘मी शिक्षक झालो तर’, ‘व्यसन कुटुंब आणि मी’ या विषयांवर तर वर्ग ९ ते १२ साठी ‘स्त्री भ्रृणहत्या एक अभिशाप’, ‘समाज सुधारकांचे शैक्षणिक योगदान’, ‘मी व माझी सामाजिक जबाबदारी’ या विषय ठेवण्यात आले होते. तर वक्तृत्व स्पर्धेत वर्ग ८ ते ९ सठी ‘प्रदूषण एक समस्या’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान’, ‘महात्मा फुले आणि शिक्षण’ तर वर्ग ९ ते १२ साठी ‘मोबाईल शाप की वरदान’, ‘वैश्विक तापमान एक समस्या’, ‘स्त्रियांची दशा व दिशा’ हे विषय ठेवण्यात आले होते. याप्रसंगी आठही तालुक्यातून उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन उपक्रमशील शिक्षक २०१७ पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सहयोग शिक्षक मंचाचे प्रवर्तक रघुपती अगडे, मार्गदर्शक हेमराज शहारे, अध्यक्ष प्रमोदकुमार बघेले, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साकुरे, सचिव अशोक चेपटे, अरविंद कोटरंगे, शिवाजीराव बडे, सचिदानंद जिभकाटे, किशोर गर्जे, श्रीकांत कामडी, युवराज बढे, अनिल मेश्राम, सुंदरसिंग साबळे, विजेंद्र केवट, तानाजी डावकरे, देवेंद्र धपाडे, गोपाल बिसेन यांनी सहकार्य केले.