शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनातून रोजगार निर्मिती करा

By admin | Updated: January 31, 2015 23:23 IST

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेटी द्याव्यात यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे, त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी सूचना

गोंदिया : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त पर्यटकांनी भेटी द्याव्यात यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे, त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.यावेळी गोंदिया उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, कृषी विकास अधिकारी शिंदे, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कातोरे, तहसीलदार संतोष महाले यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे, राजेश चांदेवार, शिवसेना जिल्हा प्रमुख शिवहरे, उपजिल्हा शिवसेना प्रमुख शैलेश जयस्वाल, सरेंद्र नायडू उपस्थित होते. ना.शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या दळण-वळण सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेत, तसेच जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकाकडे वळता पाहिजे याचे नियोजनसुद्धा अधिकाऱ्यांनी करावे असे ते म्हणाले. आरोग्यविषयक विविध अडचणींवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावातून जास्तीत जास्त सिंचन क्षमता निर्माण व्हावी, यासाठी तलावांच्या खोलीकरणाचे काम यंत्रणांनी हाती घ्यावे, असेही शिंदे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)