शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्डच ‘फेव्हरेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 05:00 IST

मध्यंतरी नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा एकदा कहर करीत आहे. अवघ्या देशातच कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने पुन्हा एकदा मागील वर्षासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यांतील स्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊनची पाळी तेथे आली आहे. अशात आता कोरोनाला हरविण्यासाठी हाती लस आली असून जास्तीत जास्त लसीकरण हाच यावर एकमेेव उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

ठळक मुद्देनागरिकांचा कोव्हीशिल्डकडेच कल : मिळाले तब्बल १.३२ लाख डोस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता लसीकरणावर भर दिला जात असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार, देशात तयार करण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन व सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्डचे डोस दिले जात आहेत. मात्र जिल्ह्यात लसीकरणाला घेऊन जिल्हावासीयांचा कल सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्डकडे जास्त दिसून येत आहे. जिल्ह्याला आतापर्यंत तब्बल एक लाख ३२ हजार ३४० डोस कोव्हीशिल्डचे मिळाले आहेत. मध्यंतरी नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा एकदा कहर करीत आहे. अवघ्या देशातच कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने पुन्हा एकदा मागील वर्षासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यांतील स्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊनची पाळी तेथे आली आहे. अशात आता कोरोनाला हरविण्यासाठी हाती लस आली असून जास्तीत जास्त लसीकरण हाच यावर एकमेेव उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. या दृष्टीने आता शासनाने ४५ वर्षे वयोगटातील प्रत्येकच नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली असून त्यानुसार लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणासाठी भारताने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन तर सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्ड लसीला मंजुरी दिली असून त्याद्वारे लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील स्थिती बघता गुरूवारपर्यंत (दि.१) ८६३५८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र यातील विशेषता अशी की नागरिकांचा कल सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्डकडे जास्त दिसत असून लसीकरण झालेल्यांमधील ५० टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हीशिल्डचाच डोस घेतला आहे.  

८६३५८ नागरिकांचे लसीकरण जिल्ह्यात गुरूवारपर्यंत (दि.१) झालेल्या लसीकरणानंतर ८६३५८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १३७७६ आरोग्य कर्मचारी, १८६७५ फ्रंटलाईन वर्कर्स, १६३२२ नागरिक ४५ ते ६० वयोगटातील तर ३७५८५ नागरिक ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे, यातील ६२११३ नागरिकांनी कोव्हीशिल्डचा डोस घेतला असून २४२४५ नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा डोस घेतला आहे.

आतापर्यंत मिळाले १.८२ लाख डोस केंद्र शासनाच्या आदेशानुसार १६ जानेवारीपासून अवघ्या देशातच लसीकरण सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत टप्याटप्याने शासनाकडून जिल्ह्याला लसींचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्याला एक लाख ८२ हजार ३४० डोस मिळाले आहेत यात एक लाख ३२ हजार ३४० डोस कोव्हीशिल्डचे आहेत, हे विशेष. आता कोव्हीशिल्ड जिल्हावासीयांची ‘फेव्हरेट’लस ठरत असे म्हणणे वावगे ठरणार नसून यामुळेच तिचे जास्त डोज पाठविले जात असावेत असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस