शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळ करणार 4 लाख 29 हजार क्विंटल धानाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. हमीभावाने धान खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचा कलसुद्धा या केंद्रावर अधिक असतो. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा कमी  दराने धान खरेदी करता येत नाही. तर यावर्षी रब्बी धानाचे बंपर पीक झाले आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाला केवळ २ लाख क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी विकास महामंडळाला रब्बी हंगामात धान खरेदीसाठी शासनाने सुरुवातीला २ लाख क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली होती. मात्र ही मर्यादा फारच कमी असल्याने यावर शेतकऱ्यांची ओरड सुरू होती. यानंतर शासनाने आदिवासी विकास महामंडळाला २ लाख २९ क्विंटल धान खरेदीच्या मर्यादेत वाढ करून दिली आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाला ४ लाख २९ हजार क्विंटल धान खरेदी करता येणार असल्याने शेतकऱ्यांनासुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत धान खरेदी केली जाते. हमीभावाने धान खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचा कलसुद्धा या केंद्रावर अधिक असतो. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव जाहीर केला असून यापेक्षा कमी  दराने धान खरेदी करता येत नाही. तर यावर्षी रब्बी धानाचे बंपर पीक झाले आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाला केवळ २ लाख क्विंटल धान खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. परिणामी शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विकण्याची वेळ आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाप्रती संतापाचे वातावरण होते. दरम्यान शासनाने आदिवासी विकास महामंडळाला धान खरेदीच्या मर्यादेत वाढ करून दिली आहे. यासंबंधीचे पत्र ६ जून काढले आहे. त्यानुसार आता आदिवासी विकास महामंडळ रब्बी हंगामाचे ४ लाख २९ हजार क्विंटल धान खरेदी करणार आहे.

३८ केंद्रावरून धान खरेदी - रब्बी हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५५२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण ३८ शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाणार आहे. यापैकी बरेच केंद्र सुरू झाले असून या केंद्रावरून धान खरेदी देखील सुरू झाली आहे. 

यंदा जिल्ह्यात रब्बीचे विक्रमी उत्पादन झाले; मात्र त्या तुलनेत केंद्र शासनाने धान खरेदीची मर्यादा फारच कमी ठरवून दिली होती. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली होती. याचीच दखल घेत शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.- सहषराम कोरोटे, आमदार

३० जून खरेदीची शेवटची तारीखआदिवासी विकास महामंडळाला शासनाने धान खरेदीची मर्यादा वाढवून देताना ३० जून ही धान खरेदीची शेवटची तारीख राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर पोहोचत धानाची विक्री करावी लागणार आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड