शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

कोरोनाने हादरलेले गाव अखेर सावरले; गोंदिया जिल्ह्यात घडली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 11:01 IST

Coronavirus positive story प्रशासनाची दक्षता आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमांमुळे कोरोनाने हादरलेले गाव अखेर सावरले. आता या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या गावाचे नाव ब्राम्हणटोला हे आहे.

ठळक मुद्देब्राम्हणटोला गावाची कोरोनावर मात जनजागृतीवर दिला भर, गावकऱ्यांचे मिळाले सहकार्य

विजय मानकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

गोंदिया : टायफाॅइड झाल्याचा समज ठेवून कोविडची चाचणी न करता बिनधास्त वावरणाऱ्या लोकांना कोरोनाने आपल्या जबड्यात पकडले. पाहता-पाहता संपूर्ण गावच कोरोना बाधित झाले. परंतु प्रशासनाची दक्षता आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमांमुळे कोरोनाने हादरलेले गाव अखेर सावरले. आता या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या गावाचे नाव ब्राम्हणटोला हे आहे.

सालेकसा तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत ब्राम्हणटोला गाव म्हणजे शंभर टक्के शेती आणि शेती पुरक व्यवसायावर अवलंबून आहे. या गावात लॉकडाऊन काळात लोक बिनधास्त घराबाहेर निघून आपली दिनचर्या सुरु ठेवून होते. पाहता-पाहता गावात कोरोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीला लोक सामान्य आजार समजून फारसे लक्ष न देता तापाची औषध घेऊन मोकळे होऊ लागले. दरम्यान पाहता-पाहता गावभर तापाचे थैमान सुरु झाले.

जवळपास ३० कुटुंबांची वस्ती असलेल्या गावात घरा-घरात तापाचे रुग्ण आढळून लागले. काही लोकांनी खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार केला. परंतु तापाचे प्रमाण वाढतच चालले. अवघ्या १५ दिवसापूर्वी सुरु झालेल्या तापाच्या संक्रमणात गावातील चार-पाच लोकांना मृत्यूने कवटाळले. यामुळे संपूर्ण गाव हादरले. ही बाब प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली. सरपंच बद्रीप्रसाद दसरिया यांच्या पुढाकाराने सर्वप्रथम गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. व गावाला चारही बाजूने सील करण्यात आले. त्यानंतर कोरोनाची नमुना चाचणीची मोहीम सुरु करण्यात आली.

गावातील लोकांना आरोग्य केंद्रात पाठविण्याऐवजी आरोग्य चमू गावात बोलावून गावाच्या शाळेत कोरोना चाचणी सुरु करण्यात आली. दरम्यान गाव सील झाल्याने लोकांनी दैनंदिनी कामे खोळंबली. त्यामुळे रस्ते खुले करा म्हणून सरपंच दसरिया यांच्या घरासमोर शेकडो लोक निदर्शने ही करु लागली. त्यांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला.

गावात लावले आरोग्य शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांधचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू रघराटे आणि डॉ. अली यांच्या मार्गदर्शनात सतत दहा दिवस येथील आरोग्य सेविका सासरवाडे व त्यांचे सहकारी आणि आरोग्य सहायक यांनी चाचणी शिबिर लावून संपूर्ण गावाची कोरोना चाचणी केली. एक आठवडापर्यंत या गावात दररोज सहा-सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघू लागले. त्यांना लगेच कोरोनाचा औषधोपचार देण्यात आला.

कोरोना चाचण्यांवर दिला भर

ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत अंतर्गत इतर चारही गावात सुद्धा फवारणी करण्यात आली. गावातील काही लोक छुप्या मार्गाने खासगी डॉक्टरांकडे जाणे सुरु केले. परंतु गावची परिस्थती बघून त्या खासगी डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्यास लावले व योग्य औषधोपचार दिला. याचा सुद्धा लाभ झाला. सतत एक आठवडा कोविड टेस्ट आणि लगेच औषधोपचार यामुळे अखेर गावात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला. मागील दोन दिवसापासून गावात एक ही कोरोना रुग्ण सापडला नाही.

पंधरा दिवसासाठी गाव केले होते सील

पंधरा दिवसासाठी गावाला सील करण्यात आले असता २० मे ला कालावधी पूर्ण होत असून काही बाबतीत सावधता ठेवून गावातील लोकांना कोरोना नियमाचे पालन करीत गावाबाहेर जाण्या-येण्यासाठी मुक्त करण्यात येत आहे. अवघ्या १५ दिवसाने चमत्कारीरीत्या कोरोनावर मात करुन परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास गावाला अखेर यश लाभले आहे.

अवैध दारु विक्रीने केला घात

ब्राम्हणटोला गावात कोरोनाची लाट येऊन गेली. याबाबत चौकशी केली असता परवानाधारक दारु दुकाने बंद असताना या गावात काही लोकांनी अवैध दारु विक्री सुरु केली. त्या ठिकाणी गावाचेच नाही तर इतर बाहेर गावचे मद्यपी सुद्धा मद्यपान करायला येत. हळूहळू मद्यपी लोकांची गर्दी वाढत गेली आणि कोरोनाची लागण झाली.

स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने गावात आरोग्य शिबिर लावून नियमित कोरोना चाचणी करुन औषधोपचार करण्यात आला. गावात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत कोरोना बद्दल जनजागृती करण्यात यश आले.

- डॉ. राजू रघटाटे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध

वेळेवर लोकांची समजूत काढण्यात यश आले. त्यावर आरोग्य विभागाने दाखविलेली समयसूचकता व प्रशासनाच्या सहकार्यामुळे गावातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले.

बद्रिप्रसाद दसरिया, सरपंच ग्रामपंचायत कावराबांध

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या