शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

सद्य:स्थितीत इयत्ता पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. शाळा सुरू होऊन आता जवळपास पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे पालकसुद्धा आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवित होेते. मात्र महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. 

ठळक मुद्दे१७ विद्यार्थ्यांना लागण : ११ शिक्षक निघाले कोरोना बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता कोरोनाने शाळांमध्येसुद्धा शिरकाव केला आहे. दोन दिवसांच्या कालावधीत १७ विद्यार्थी आणि ११ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सद्य:स्थितीत इयत्ता पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. शाळा सुरू होऊन आता जवळपास पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे पालकसुद्धा आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवित होेते. मात्र महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. याच अनुषंगाने आता शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. याच चाचणीदरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १७ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले तर ११ शिक्षकांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे. शुक्रवारी सालेकसा, अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला. त्यामुळे शाळांकडूनसुद्धा दक्षता बाळगली जात आहे. दरम्यान, शाळांमध्ये कोरोनाचा विळखा वाढल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हीच बाब ओळखून शिक्षण विभागानेसुद्धा किमान १५ दिवस शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. 

३१ मार्चपर्यंत शाळा राहणार बंद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यातच आता शाळांमध्येसुद्धा कोरोनाने एन्ट्री केल्याने तसेच आतापर्यंत पाचवी ते आठवीपर्यंतचे १७ विद्यार्थी आणि ११ शिक्षक कोरोनाबाधित निघाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून २० ते ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासंबंधीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले.  

विद्यालये राहणार बंद कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३१ मार्चपर्यंत पाचवी ते ११ वीपर्यंतच्या सर्व शाळा आणि विद्यालये तसेच शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयेसुद्धा बंद राहणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे त्यांना केवळ प्रात्यक्षिक परीक्षा देऊन घरी जाता येणार आहे. शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी शाळा, विद्यालये बंद राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा