शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

कोरोनामुक्त गावात शाळांची घंटा वाजली पण उपस्थिती मोजकीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

केशोरी : महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनामुक्त गावातील शाळा वर्ग आठवी ते बारावीपर्यंतचे अटी व शर्तीच्या ...

केशोरी : महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनामुक्त गावातील शाळा वर्ग आठवी ते बारावीपर्यंतचे अटी व शर्तीच्या आधीन राहून १५ जुलैपासून सुरु झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचा ठराव व पालकांचे संमतीपत्र घेवून शाळा सुरु झाल्या असल्या तरीही आदिवासी व ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी उपस्थिती नगण्य दिसून येत आहे.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शाळांची घंटा वाजल्याने काही विद्यार्थी आनंदाने येतात तर काही विद्यार्थी घरीच राहून आई-वडीलांच्या व्यवसायात मदत करीत आहे. महाराष्ट्रातील शाळा २० मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या संकटामुळे बंद होत्या. शहराप्रमाणे खेड्यांनीही कोरोना महामारीचा अनुभव घेतला आहे. कोरोना भीतीमुळे कोणीही घराबाहेर पडत नव्हते. सर्व विद्यार्थी भयभीत होवून घरातच बंदीस्त झाली होती. यामुळे शिक्षणाचे तंत्र बिघडले होते. शासनाने शैक्षणिक नुकसान भरुन काढण्याचे दृष्टीने ऑनलाईन शिक्षण प्रणाली अंमलात आणली आहे. परंतु आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरु शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आहे. कोरोना महामारीचा प्रभाव कमी होताच ग्रामपंचायतीचा ठराव व पालकांचे समंती पत्र घेवून कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतींनी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेवून ठराव शाळांना पाठविण्यात आले. बऱ्याच दिवसानंतर शाळेची घंटा विद्यार्थ्यांच्या कानावर पडली. पहिल्याच दिवशी बंदीस्त विद्यार्थी घराबाहेर पडल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले होते. या भागातील शाळा सुरु होवून पंधरा दिवस होत आहेत. परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच आहे.

.................

मुले करीत आहेत आईवडिलांना मदत

कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी आपल्या आई-वडीलांच्या व्यवसायात मदत करीत असून अजून ही तेच सुरु आहे. म्हणून शाळेत विद्यार्थी उपस्थिती फारच अल्प दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. शाळेत सुरक्षितता बाळगून उपस्थित होत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपापल्या बाकावर विराजमान झालेल्या विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर शाळा चालू झाल्याचे आनंदी हास्य दिसून येत आहेत.