शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २५ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीय हादरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्यविषयक उपयायोजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. गुरूवारी (दि.१३) आढळलेल्या १९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यात ४ रुग्ण आढळले आहे.

ठळक मुद्दे१९ बाधितांची भर : १० कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त, २६२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. मागील १२ दिवसात ४५० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. गुरूवारी (दि.१३) आणखी १९ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७२७ वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. तर १० कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण ४२८ जणांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र आहे.बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २५ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीय हादरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्यविषयक उपयायोजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. गुरूवारी (दि.१३) आढळलेल्या १९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यात ४ रुग्ण आढळले आहे. गोंदिया शहरातील सिव्हील लाईन येथील एक, दवनीवाडा, एकोडी व काटी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. तिरोडा तालुक्यातील सात रुंग्णामध्ये रामनगर तिरोडा येथील दोन रुग्ण, बिरसी येथील व सर्रा येथील प्रत्येकी दोन रुग्ण, एक रुग्ण गराडा येथील आहे.४ रुग्ण गोरेगाव तालुक्यात आढळले असून कलपाथरी व घोटी येथील प्रत्येकी एक रुग्ण व तुमखेडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. आमगाव तालुक्यात चार रुग्ण आढळले असून यामध्ये आमगाव, बनगाव, डोंगरगाव व कालीमाटी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनावर मात मात केलेल्यांमध्ये गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी येथील एक, तर ९ रु ग्ण तिरोडा तालुक्यातील असून ७ रुग्ण हे मुंडीपार व २ रुग्ण घोगरा येथील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १२ हजार १४७ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी ११ हजार ६९ नमुने निगेटिव्ह आले आहे.तर ७२७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर २६६ नमुयांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. २१५ स्वॅब नमुन्याचा अहवाल अनिश्चित आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या