शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया तालुक्याचे कोरोना मीटर सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

जिल्ह्यात रविवारी ११ बाधितांची नोंद झाली तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. रविवारी आढळेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १० कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात असली तर गोंदिया तालुक्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

ठळक मुद्देअधिक सतर्कता बाळगण्याची गरज : ११ बाधितांची नोंद, बाधितांचा आकडा ८ हजार पार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   मागील आठ दहा दिवसांपासून गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील कोरोनाचे मीटर सातत्याने सुरुच असून आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ८३२० वर गेला आहे. तर सद्यस्थितीत १०४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात रविवारी ११ बाधितांची नोंद झाली तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. रविवारी आढळेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १० कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात असली तर गोंदिया तालुक्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ७०५४९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ५८७७९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्याठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६८६०३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६२३९८ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४४३३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४११८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १५ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. आतापर्यंत १ लाख ४० हजार चाचण्या जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १ लाख ४० हजार चाचण्या करण्यात आल्या आहे. यात १४४३३ कोरोना बाधित आढळले असून १४११८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दर १२.९ असून मृत्यू दर १.२० टक्के आहे. संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरच नियमित वापर करावा. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि दिवसभरात वारंवार हातपाय स्वच्छ पाण्याने धुवावे, आदी गोष्टींचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या