शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

कोरोनामुळे ५६ बालके झाली अनाथ (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:31 IST

नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही ...

नरेश रहिले

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले आहे. आताही कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या काळात अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधारच गेला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोनासोबतची झुंज अपयशी ठरली. मातृ-पितृ छत्र हरवलेल्या बालकांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५६ बालके अशी आढळलीत की त्यांच्या आई-वडिलांपैकी एकाचा काेरोनाने मृत्यू झाला, तर ३ बालकांचे आई-वडील दोघेही मरण पावले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६७५ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ वर्षांखालील ५६ बालके अशी आढळली की त्यांचे पालक कोरोनामुळे हे जग सोडून गेले. जिल्हाभरातील माहिती घेणे सुरू असल्याने हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय कृती दल गठन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी (जि.प.), तसेच चार निमंत्रित सदस्यांचा या कृती दलात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत गावस्तरापासून ही माहिती संकलित केली जात आहे.

...........................

मिळेल बालसंगोपन योजनेचा लाभ

-आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १८ वर्षांखालील बालकाला बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यातील ५६७ बालकांना ४२५ रुपये दरमहा ही मदत देण्यात येते.

-शासनाने या संगोपन योजनेच्या लाभात वाढ केली असून, ११०० रुपयांप्रमाणे मदत एप्रिल महिन्यापासून देण्याचे शासनाने ठरविले; परंतु ही मदत अद्याप देण्यात आली नाही.

- जुन्याच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना संचारबंदीच्या काळात लाभ देण्यात आला नाही. शासनाने विविध घटकांची काळजी घेऊन ५०० कोटींहून अधिकचे पॅकेज ऑटोचालक, फेरीवाले, बांधकाम मजुरांना वाटले; परंतु बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानच दिले नाही. या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?

कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुला-मुलींचा शोध ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविकांमार्फत घेतला जात आहे. कोविड मृताचे नाव, वय, पत्ता, पालक संपर्क पत्ता व पूरक माहिती संकलित केली जात आहे. हा अहवाल आल्यानंतर परिविक्षा अधिकारी (गृह) चौकशी करतात. त्यानंतर बालसंगोपन योजना किंवा बालगृहातून लाभ देण्याबाबत निर्देश असल्याचे परिविक्षा अधिकारी गोबाळे यांनी सांगितले.

...............................................

कोरोनाने आई किंवा वडील हिरावलेल्यांची संख्या ५६

मुले--२५

मुली-- ३१

..............................

कोट

महाराष्ट्र शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्णयानुसार विविध विभागांकडून ग्रामपातळीवर एक पालक, दोन्ही पालक गमावल्याची माहिती घेतली जात आहे. शहरी भागात नगर परिषद व आरोग्य विभागाकडून माहिती घेतली जात आहे. अशा बालकांचे बालसंगोपन योजना, बालगृहाद्वारे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण व पुनर्वसन केले जाणार आहे. एकही मूल उघड्यावर राहणार नाही. दर आठवड्याला संकलित होणारी अद्ययावत माहिती राज्य व केंद्र शासनाला पाठविली जात आहे.

- तुषार पवनीकर जिल्हा महिला बालविकास अधिकारी, गोंदिया.