शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण पर्वावरही कोरोनाचे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 20:47 IST

दिगांबर जैन मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण झाले असून तेथेच नवीन मंदिर १४ वर्षापूर्वी तयार करण्यात आले आहे. लाल दगडाने सुंदर असे मंदिर तयार करण्यात आले आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठी आराधना करण्याचा पर्व असतो. त्याग व तपस्येचा हा पर्व असून यामध्ये जैन बांधव सकाळी ५ वाजता उठून १० दिवस त्यांच्या देवांचे पूजन, अभिषेक व शांतीधारा करतात.

ठळक मुद्देघरालाच बनवू मंदिर : कोरोनामुळे यंदा कार्यक्रम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनामुळे यंदा सर्वच धर्मीयांच्या सणासुदीवर परिणाम पडत असतानाच दिगांबर जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वावरही त्याचे परिणाम जाणवत आहेत. कोरोनामुळे येथील जैन मंदिरात कोणतेही कार्यक्रम होणार नसून पर्युषण पर्व प्रत्येक जैन बांधवाने घरातच राहून साजरा करावा असे दिगांबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय जैन यांनी कळविले आहे.येथील दिगांबर जैन मंदिराला यंदा १०० वर्षे पूर्ण झाले असून तेथेच नवीन मंदिर १४ वर्षापूर्वी तयार करण्यात आले आहे. लाल दगडाने सुंदर असे मंदिर तयार करण्यात आले आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठी आराधना करण्याचा पर्व असतो. त्याग व तपस्येचा हा पर्व असून यामध्ये जैन बांधव सकाळी ५ वाजता उठून १० दिवस त्यांच्या देवांचे पूजन, अभिषेक व शांतीधारा करतात. दररोज दुपारी स्वाध्याय आणि समायीक केले जाते. रात्रीला आरती व बाहेरून येणाऱ्या पंजितांकडून प्रवचनमाला होते. रात्री ९ वाजता विविध सांस्कृतिक व बौद्धीक कार्यक्रम केले जाते. हे सर्व कार्यक्रम १०० वर्षापासून केले जात आहेत.समाजातील तरूण व वृद्ध आपल्या शक्तीनुसार तप व आराधनेत उपवास करतात. जैन धर्मीय २४ तासात केवळ १ तास एकच वेळी पाणी पितात. त्यानंतर पुन्हा २४ तासात पाणी घेतात व आपापल्या शक्तीनुसार उपवास ठेवतात. हे उपवास ३ ते १० दिवस केले जातात. तपस्येच्या आधारावर जैन धर्म चालत असून पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या देवाचा अभिषेक करून भगवनाजीची प्रतिमा विराजमान करून शोभायात्रा काढली जाते.मात्र यंदा कोरोनामुळे व सर्व धर्मगुरूंच्या मार्गदर्शनानुसार तसेच शासन नियमानुसार येथील दिगांबर जैन समाजानेही सहयोग देण्याच्या दृष्टीने विश्व कल्याणासाठी सर्व कार्यक्रमांना रद्द केले आहे. यावर्षी कोणत्याही कार्यक्रमासाठी मंदिर उघडले जाणार नाही असे सांगीतले आहे.पर्युषण पर्वाच्या या १० दिवसांत दिगांबर जैन समाजबांधवांनी नियमानुसार पूजापाठ व तपस्या आपापल्या घरीच राहून करावी. घरालाच मंदिराचे स्वरूप द्यावे व दरवर्षी प्रमाणे आपला नित्यक्रम ठेवावा.-संजय जैनअध्यक्ष, दिगांबर समाज गोंदियायंदा मुनीश्री येणार नाहीतदरवर्षी पर्युषण पर्वात प्रवचन करण्यासाठी संत व मुनीश्री गोंदियात दाखल होतात. जैन बांधव त्यांच्या अमृतवाणीचे रस ग्रहण करतात. परंतु कोरोना संकटाला पाहून यंदा प्रवचनासाठी येथील दिगांबर जैन मंदिरात किंवा कुठेही संत व मुनिश्री येणार नाहीत असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे घरातूनच पर्युषण पर्व साजरा होणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक