लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. लहानपासून ते वृध्दापर्यंत सर्वांनाच कोरोनाने ग्रासले आहे.त्यातच जिल्ह्यातील ३० ते ४४ वयोगटातील सर्वाधिक कोरोना बाधित असून त्या पाठोपाठ १५ ते २९ वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक कोरोनाची लागण झाली असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवावर्ग कोरोनाच्या विळख्यात असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन दिसून येते.मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याने कोरोना आता जिल्ह्यात ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर ९ सप्टेंबरपर्यंत १११७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या महिन्यातील आणखी २० दिवस शिल्लक असून कोरोना बाधितांची संख्या पाहता कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.मागील नऊ दिवसांपासून सरासरी १०० रुग्ण निघत असल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या समुह संपर्काला तर सुरूवात झाली नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच गोंदिया तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधित आढळले आहे.त्यामुळे हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५८९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १३७५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वयोगटानुसार संख्या पाहिल्यास ३० ते ४४ वयोगटातील सर्वाधिक ३२.७० टक्के आहे. तर त्या पाठोपाठ १५ ते २९ या वयोगटातील २४.४० टक्के कोरोना बाधित आहेत. तर ४५ ते ५९ या वयोगटातील २१.९० टक्के आणि ६० वर्षावरील वयोगटातील १०.५० टक्के आणि ० ते १४ वयोगटातील १०.५० टक्के कोरोना बाधित आहे.१५ ते २९ आणि ३० ते ४४ या वयोगटातील सर्वाधिक कोरोना बाधित असल्याने जिल्ह्यातील युवावर्ग कोरोनाच्या विळख्यात आहे. ही आकडेवारी ऑगस्ट महिन्याची असून सप्टेंबर महिन्यात या आकडेवारीत थोडाफार बदल झाला आहे. मात्र कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्यान जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.कोरोना गेल्यावर रिक्त पदे भरणार का ?शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. ही पदे अद्यापही भरण्यात आली नसल्याने कोविड काळात उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेतील आठ कर्मचारी कोरोना बाधित आल्याने तिथे काम करण्यासाठी केवळ तीन चारच कर्मचारी आहेत.त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला असून दोन ते तीनच तास स्वॅब नमुने घेतले जात आहे. परिणामी चाचणीसाठी जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.दर आठवड्यात सरासरी ४८० बाधितजिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मागील महिन्यात एकूण ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. सरासरी ४८० कोरोना बाधितांची भर पडत होती. तर सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाचा विस्फोट झाला असून आठवडाभरात १ हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यामुळे या महिन्यातील कोरोना बाधितांच्या सरासरी आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.उपाययोजनांचा अभावजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. मात्र आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव दिसूत येत आहे. कोविड केअर सेंटर आणि मेडिकल रुग्णालयामधील अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. त्यामुळे बरेच जण लक्षणे असून सुध्दा तपासणी करण्यासाठी जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.
युवा वर्ग कोरोनाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST
कोरोनाला प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याने कोरोना आता जिल्ह्यात ऑऊट ऑफ कंट्रोल झाल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ११९३ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर ९ सप्टेंबरपर्यंत १११७ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या महिन्यातील आणखी २० दिवस शिल्लक असून कोरोना बाधितांची संख्या पाहता कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.
युवा वर्ग कोरोनाच्या विळख्यात
ठळक मुद्देकोरोनाचा वाढतोय संसर्ग : ३० ते ४४ वयोगटातील व्यक्ती सर्वाधिक कोरोना बाधित