गोंदिया : कोरोनाचा संसर्ग सन २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी कहर करणारा मलेरिया आणि डेंग्यू हा आजार जणू पळाल्याचीच स्थिती जिल्ह्यात दिसून आली. सन २०१९च्या तुलनेत सन २०२०मध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या रुग्णांत घट दिसून आली. सन २०१९ला गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूचे ३७ रुग्ण आढळले होते, तर सन २०२०ला डेंग्यूचे चार रुग्ण आढळले आहेत. सन २०१६ मध्ये डेंग्यूचे २, सन २०१७ मध्ये १, सन २०१८ मध्ये ११ रुग्ण, सन २०१९ मध्ये ३७, तर कोराेनाचा उद्रेक असल्याने सन २०२० मध्ये फक्त डेंग्यूचे चार रुग्ण पुढे आले. कोरोनाचे आगमन झाल्यानंतर भयावह असलेला डेंग्यू पळाला अशी चिन्हे सन २०२० या वर्षात गोंदिया जिल्ह्यात दिसून आली. गोंदिया जिल्हा वनाच्छादित असल्याने मोठ्या प्रमाणात मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात आढळतात. ह्या आजारामुळे वेळीच उपचार न झाल्याने नागरिकांचा मृत्यूदेखील होतो. परंतु अख्खे जग सन २०२० मध्ये कोरोना कोरोना ओरडत असताना डेंग्यू आजारही जणू कोरोनाच्या भीतीने पळून गेल्यासारखी स्थिती जिल्ह्यात आहे.
बॉक्स
डेंग्यूचे सर्वेक्षण नियमित
डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्यसेवकांमार्फत दहा दिवसीय कार्यक्रम आरोग्य विभागाकडून घेण्यात येतो. आशासेविका यांनी आपापल्या गावातील नागरिकांकडील भांडी, रांजन, पाणी ठेवण्याचे साधने यांची तपासणी करतात. यासाठी आरोग्य विभागाकडून आशासेविकांना महिन्याकाठी २०० रुपये अतिरिक्त देण्यात येत आहे. मलेरियासारखेच सर्वेक्षण डेंग्यूचे करण्यात येत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी सांगितले.
बॉक्स
सन -२०१६-०२
सन -२०१७-०१
सन -२०१८-११
सन -२०१९-३७
सन -२०२०-०४
डेंग्यूची लक्षणे
.-एकदम जोरात ताप चढणे
-डोक्याच पुढचा भाग अतिशय दुखणे
-डोळ्याच्या मागील भागात वेदना जी डोळ्याच्या हालचालीसोबत अधिक होते.
- स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होते
- चव आणि भूक नष्ट होणे
-छाती आणि वरील अवयांवर गोवऱ्यांसारखे पूरळ येणे
-मळमळ होणे, उलट्या होणे, त्वचेवर पुरळ येणे.