शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढली चारचाकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

गोंदिया : कोरोना संसर्गजन्य आजार असून, बाधितांच्या संपर्कात आल्यानेही त्याची बाधा होते. परिणामी नागरिकांत चांगलीच धास्ती असून अशात प्रवास ...

गोंदिया : कोरोना संसर्गजन्य आजार असून, बाधितांच्या संपर्कात आल्यानेही त्याची बाधा होते. परिणामी नागरिकांत चांगलीच धास्ती असून अशात प्रवास करताना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कित्येकांनी आता आपल्या कामकाजासाठी प्रवासी वाहनांत जाण्यापेक्षा आपलीच दुचाकी किंवा चारचाकी खरेदी केली आहे. कुणाच्याही वाहनातून प्रवास करून धोका पत्करण्यापेक्षा आपलेच वाहन बरे, अशी नागरिकांची मनस्थिती बनली आहे. यातूनच जिल्ह्यात प्रवासी वाहनांपेक्षा दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे.

------------------------------------

दुचाकी-चारचाकी विक्री वाढली

दुचाकी चारचाकी

२०१९ १५९२१ १११३

२०२० १६४८१ १२४१

२०२१ (मार्चपर्यंत) १२१३८ १५०७

२) ऑटो-टॅक्सी कारची विक्री घटली

ऑटो टॅक्सीकार

२०१९ २८९ ११

२०२० १५७ २०

२०२१ (मार्चपर्यंत) १० ०९

---------------------------------------

३) ऑटोचालक - टॅक्सीचालक परेशान

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे आम्हालाही प्रवासी बसविताना भीती वाटते. मात्र, आमची रोजीरोटी असल्याने आम्ही संपूर्ण खबरदारी घेऊन गाडी चालवितो. मात्र, कोरोनाच्या भीतीने प्रवाशांची संख्या आता कमी झाली आहे. बहुतांश नागरिक स्वत:च्या वाहनानेच प्रवासाला प्राधान्य देत आहेत. यामुळे आमच्या रोजगारावर गदा आली आहे.

- सतीश समुद्रे (ऑटो चालक)

-----------------------------

प्रवासी व आमच्या सुरक्षेसाठी आम्ही ऑटो वारंवार सॅनिटाईज करीत असतो. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनी आता एकतर प्रवास टाळले आहेत. त्यातही जर अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच ते प्रवास करतात. यातही आपल्या दुचाकी किंवा चारचाकीनेच प्रवासाला त्यांची प्राथमिकता आहे. यामुळे पूर्वीसारखा आमचा धंदा राहिलेला नाही.

- तेजराम हलमारे (ऑटो चालक)

-------------------------------

...म्हणून घेतली चारचाकी

कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, प्रवासादरम्यान संपर्कात आलेल्या नागरिकांमुळेही त्याची लागण होऊ शकते. अशात प्रवास टाळणे गरजेचे आहे. मात्र, आमच्या कामामुळे प्रवास करावाच लागतो. त्यामुळे स्वत:ची गाडी असली तर कामेही होतात शिवाय कुटुंबीयांचीही सोय होते. म्हणूनच स्वत:ची चारचाकी घेतली.

- मिलिंद वैद्य

----------------------------

बस किंवा ऑटोसारख्या प्रवासी वाहनांतून प्रवास केल्याने अन्य नागरिकांच्या संपर्कात येऊन कोरोना संसर्गाची भीती असते. अशात प्रवासी वाहनांपेक्षा आपल्या स्वत:च्या वाहनानेच प्रवास केलेला बरा. याकरिता स्वत:चे चारचाकी वाहन खरेदी केले आहे.

- रोहित गणवीर