शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मानकर गुरूजीचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: February 5, 2017 00:21 IST

लोकांना हेवा वाटावा अशी भवभूती शिक्षण संस्थेची दैदिप्यमान वाटचाल आहे. भाजपाला वाढविण्यात

पालकमंत्री बडोले : लक्ष्मणराव मानकर गुरूजी जयंती महोत्सव आमगाव : लोकांना हेवा वाटावा अशी भवभूती शिक्षण संस्थेची दैदिप्यमान वाटचाल आहे. भाजपाला वाढविण्यात स्व.लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आलेले आहेत. त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. शनिवारी येथे (दि. ४) लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.गिरीष व्यास (नागपूर) होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आ.संजय पुराम व सर्व सत्कारमूर्ती मंचावर विराजमान होते. सर्वप्रथम आदर्श विद्यालयामध्ये मानकर गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भवभूती महाविद्यालयातील महर्षी भवभूती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलिटेक्निकद्वारा निर्मित प्रोजेक्ट प्रदर्शनीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी आ.गिरीष व्यास, गोंदियाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडाच्या सोनाली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच माजी आ.हरिष मोरे, डॉ.गजानन डोंगरवार, नटवरलाल गांधी, नाना नाकाडे, भरत क्षत्रिय, चि.तु.पटले यांनी गुरुजींना आयुष्यभर मोलाचे सहकार्य दिल्याप्रित्यर्थ त्यांचाही सत्कार करण्यात आला. भवभूती शिक्षण संस्थेतर्फे डॉ. श्रीराम भुस्कुटे, डॉ.डी.के.संघी, डॉ.दानी, डॉ. कुंभलकर व प्रेरणा हेमने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेतील विविध घटक संस्थांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव केशवराव मानकर यांनी सर्व घटक संस्थांची माहिती दिली. ३ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७५ लोकांनी रक्तदान केल्याचे सांगितले. पंतप्रधान कौशल्य विकासाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण व कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष सुरेश असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, स.र.अंजनकर, ढे.र.कटरे, हरिहर मानकर, लक्ष्मीबाई नागपुरे, रमेश कावळे, उर्मिला कावळे, समारंभाचे संयोजक डॉ. श्रीराम, डॉ.डी.के.संघी, जयंत बन्सोड, संदीप हनुवते, ए.ए.सड्डल, राऊत, रंजितकुमार डे, कोटांगले, प्राचार्य रहांगडाले, इ. मंचावर विराजमान होते. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.उमेश मेंढे, प्रा.पठ्ठे व प्रा.अर्पना कटरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.श्रीराम भुस्कुटे यांनी केले.