शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्व्हेंट फॅशनमुळे शिक्षण महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:44 IST

सध्या इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये मुले शिकविण्याची फॅशन जोमात सुरु आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. याचाच फायदा घेऊन काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील कॉन्व्हेंट सुरु केले आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्व्हेंट सुरु करण्यात आल्याने आता शिक्षण महागले आहे.

ठळक मुद्देचमक-धमक दाखवून लूट : पालकांच्या खिशाला कात्री

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये मुले शिकविण्याची फॅशन जोमात सुरु आहे. पालकांच्या दृष्टीने ते एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. याचाच फायदा घेऊन काही संस्थांनी आवश्यकता नसेल तेथे देखील कॉन्व्हेंट सुरु केले आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात कॉन्व्हेंट सुरु करण्यात आल्याने आता शिक्षण महागले आहे. या कॉन्व्हेंटपैकी किती कॉन्व्हेंटना विशेष मान्यता आहे, याची देखील कल्पना कुणाला नाही. त्यामुळे अनधिकृतपणे सुरु केल्या जाणाऱ्या कॉन्व्हेंटवर कारवाई कोण करणार? असा प्रश्नदेखील सामान्य नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.अडीच ते पाच वर्षे वय असणाºया बालकांना कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश दिला जातो. निटनेटका ड्रेस, टाय, बेल्ट, आयकार्ड, पाठीवर दप्तर, टिफीन, वॉटरबॅग आदी साहित्यांनी सजलेला आपला बालक बघून पालकांनादेखील धन्यता वाटत आहे. बालक कॉन्व्हेंटमध्ये जातो. चांगल्या गोष्टी शिकतो. चांगल्या सवई लागतात. कविता म्हणून दाखवितो. या बाबी जरी सत्य असल्या तरी बालकांच्या मानसिकतेनुसार अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो का? या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.वास्तविकपणे या वयातील बालकांच्या मानसशास्त्रानुसार त्यांच्यासाठी अध्ययन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून हे करणेदेखील शक्य आहे. परंतु गुणात्मक प्रगतीवर संख्यात्मक प्रगती वरचढ झाल्यामुळे शिक्षण पद्धतीतील आनंद पार विरुन गेला आहे. त्याची जागा धोकमपट्टीने घेतली. कॉन्व्हेंटमध्ये अध्यापन करणारे किती जण प्रशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती कोणत्या, हे कळायला मात्र मार्ग नाही.ज्या कोवळ्या वयात बालकांच्या मनाला वळण द्यायचे असते ते काम कुशल कारागिरांकडून होणे अपेक्षित असते. परंतु बºयाच ठिकाणी मात्र तसे होताना दिसत नाही. आपली कोवळी फुले कोमेजून तर जाणार नाही! याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे.शहर ते गावापर्यंत रस्त्याच्या आजूबाजूला अनेक कॉन्व्हेंटचे फलक लागलेले दिसतात. विविध सुविधांचे त्यामध्ये प्रदर्शनदेखील केलेले असते. प्रत्यक्षात किती कॉन्व्हेंटमध्ये तशा सुविधा उपलब्ध असतात, हे सांगणे मात्र कठीण आहे. असे असतानाही पालक आपल्या चिमुकल्याला फक्त चांगली चमक-धमक बघून त्या कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. हीच बाब हेरून आता बघावे तेथे कॉन्व्हेंटचा पसारा झाला आहे. यात मात्र पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.मोठे ग्रुपही होत आहेत दाखलशहरात स्थानिक व्यक्तींकडून किंवा लगतच्या पसिरातील व्यक्तींकडून कॉन्व्हेंट, शाळा-महाविद्यालय सुरू जात होते. मात्र पालकांचे शिक्षणाप्रती वाढलेले आकर्षण व मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तेवढे पैसे खर्च करण्याची कमजोरी बघून आता मोठे ग्रुपही आपले हातपाय पसरत आहेत. जिल्ह्यात सध्या मोठ्य ग्रुपकडून फ्रेंचायसीवर सुरू असलेले कितीतरी कॉन्व्हेंट बघावयास मिळत आहेत. त्यात दरवर्षी आणखी नव्या ग्रुपची भर पडतच आहे.

टॅग्स :Schoolशाळा