शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:32 IST

प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअनिल राठी : वार्षिक स्नेहसंमेलन, विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन करावे, शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया आहे,असे उद्गार अमरावती येथील राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक अनिल राठी यांनी व्यक्त केले.सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, जीएमबी इंग्लीश मिडीयम हायस्कूल व एसडीसी कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटिका डॉ. सोनल चांडक, किरण रापतवार, अध्यक्ष डॉ. वल्लभदास भुतडा, संस्था सचिव तथा प्राचार्य अनिलकुमार मंत्री, पर्यवेक्षिका वीणा नानोटी, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, मुकेश शेंडे, सुनिता डांगे, सरीता शुक्ला, संयोजक कुंडलिक लोथे, प्रा. इंद्रनिल काशिवार, विष्णू चाचेरे,विद्यार्थी प्रतिनिधी गौरांग खोटेले, सलोनी बघेले उपस्थित होते. देवी सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करुन वार्षिकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अनिल मंत्री यांनी तर शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षिका वीना नानोटी यांनी केले. परिचय संयोजक कुंडलिक लोथे यांनी करुन दिला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी जयंत लोणारे, दिव्यानी शहारे, अवंती राऊत, आशिष कापगते, सलोनी पालीवाल, अनुष्का ब्राम्हणकर, प्रशिक शहारे, अनघा पिल्लेवार, कलाध्यापक रुपराम धकाते यांचा सत्कार करण्यात आला. विविध हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.कलाध्यापक रुपराम धकाते यांनी संस्थाध्यक्ष घनश्यामदास भुतडा यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. सुशिलादेवी भुतडा, पुष्पा भैय्या, डॉ.वल्लभदास भुतडा यांनी ती स्विकारली. संस्थेतर्फे अतिथींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करुन यशाचे शिखर गाठावे असे डॉ. वल्लभदास भुतडा यांनी सांगीतले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन संजयकुमार बंगळे व अर्चना गुुरुनुले यांनी केले तर आभार विष्णू चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Educationशिक्षण