विद्युत वितरण कंपनी : ‘आले मनात चालले वनात’चा प्रकार गोंदिया : इमरजन्सीच्या नावावर गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून केव्हाही भारनियमन केले जात आहे. विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोंदिया शहरातही काही ठिकाणी चार तास, काही ठिकाणी तीन तास तर काही ठिकाणी ४ तास ४५ मिनीटाचे भारनियमन केले जाते. ओल्टेज कमी असल्यामुळे हे भारनियमन केले जात आहे.काही ठिकाणी ओल्टेज कमी असल्यामुळे तर काही ठिकाणी इमरजन्शी लागू करून भारनियमन करण्यात येत आहे. फुलचूर फिडरवर सकाळी ६ ते ८.३० व सकाळी ११.४५ तग २ वाजता दरम्यान भारनियमन करण्यात येत आहे. सिव्हील लाईन येथील भारनियमन सकाळी ६ ते ८ वाजता व दुपारी १२.३० व २.३० वाजता भारनियमन केले जाते. अदासी फिडरवरून सकाळी ६ ते ७.३० व दुपारी १ तग २.३० वाजता दरम्यान भारनियमन केले जाते. १३ जुलै पासून जिल्ह्यात भारनियमन केले जात आहे. प्रत्येक फिडरवर वेगवेगळ्यावेळी भारनियमन केले जात आहग. विद्युतचा पुरवठा होत असताना कमी ओल्टेज असल्यामुळे तर इमरजन्शी या दोन कारणांमुळे भारनियमन केले जात आहे. भारनियमन सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना या संदर्भात तक्रार करणग आवश्यक असताना विद्युत वितरण विभागाने कसल्याही प्रकराच्या सूचना ग्राहकांना न देता सरसकट भारनियमन सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)नवीन शेड्युल येणारभारनियमनासंदर्भात नविन माहिती पुन्हा आज बुधवारी पोहचली आहे. परंतु कोण्या वेळेत व किती तास भारनियमन करावेत अश्या सूचना गुरूवारी येणार असल्याचे विद्युत वितरण कंपनीच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे. मात्र सध्यातरी कोणतीही माहिती नसल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्राहकांना माहिती न देता भारनियमन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 01:41 IST