नक्षलवादी घातपात घडविण्यासाठी हत्यार लपवितात. अशात लपविण्यात आलेल्या हत्यारांना पोलिसांनी शोधून काढले आहे. सालेकसा तालुक्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली होत असल्याची गुप्त माहिती मिळताच गुरुवारी (दि.९) दुपारी सालेकसापासून ३० किलोमीटर अंतरावरील देवरी तालुक्यातील बटुकचुहा जंगलात शोध मोहीम करण्यासाठी सी-६० जवान निघाले असताना त्यांना एक जुनी ९ एमएम कार्बाइन मशीनगन व त्यात एक बुलेट जप्त करण्यात आली. सोबतच एक लाकडी रायफलचा बट पडलेला मिळून आला असून पोलिसांनी जप्त केला आहे. या परिसरात नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती आहे. या संदर्भात सालेकसा पोलीस ठाण्यात गड़चिरोली जिल्ह्याच्या भामरागड क्षेत्रात सक्रिय डीवीसी नक्सल कमांडर देवचंद उर्फ नरेश उर्फ चंदू व गडचिरोली नक्षल डिवीजनची रानो ऊर्फ रामे नरोटे व त्यांच्या इतर सहा नक्षलवाद्यांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, सहकलम १८ , २० , २३ बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल करीत आहेत.
नलक्षलवाद्यांनी लपविलेले साहित्य जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST