शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

वजन काटा विक्रेत्याला ग्राहक न्यायमंचचा झटका

By admin | Updated: December 7, 2014 22:52 IST

वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली.

गोंदिया : वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. मंचाने आपल्या न्याय निवाड्यात नुकसान भरपाईसह वजन काट्याची किंमत परत करण्याचे आदेश देत ग्राहकाला दिलासा दिला.सडक/अर्जुनी तालुक्याच्या फुटाळा येथील रहिवासी चत्रुगण गणपत ब्राह्मणकर असे तक्रारकर्त्याचे नाव असून त्याचे गावातच जान्हवी किराणा स्टोर्स आहे. त्यांनी गोंदियाच्या देशबंधू किर्ती इंन्टरप्रायजेसचे संचालक मुकेश भोजवानी यांच्याकडून इलेक्ट्रानिक वजन काटा ७ जानेवारी २०१३ रोजी चार हजार ५०० रूपयांत खरेदी केले. २० फेब्रुवारी २०१३ रोजी त्यात बिघाड झाल्याचे त्यांनी दूरध्वनीवरून कळविले. भोजवानी यांनी दखल न घेता वजन काटा दुरूस्त करून न देता सेवेत त्रुटी केली. यानंतर ग्राहक ब्राह्मणकर यांनी त्यांना पत्र पाठवून दुरूस्तीची मागणी केली, तसेच वैधमापन शास्त्र यांनासुद्धा पत्र पाठविले. मात्र दखल घेण्यात न आल्याने त्यांनी १२ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून ९ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायमंचात तक्रार दाखल केली. यानंतर मंचामार्फत नोटीस पाठविल्यावर किर्ती इंटरप्रायजेसचे संचालक भोजवानी यांनी हजर होवून लेखी जबाब नोंदविला. त्यात ग्राहक ब्राह्मणकर यांनी ७ जानेवारी २०१३ रोजी ३० किलो क्षमतेच्या वजन काट्याची तोंडी मागणी चार हजार ५०० रूपयांत केली होती. त्याआधारे एक हजार ४५० रूपयांचा जुना वटन काटा व एक हजार ५० रूपये रोख दिले होते. उर्वरित दोन हजार रूपये १६ जानेवारी २०१३ रोजी देण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवशी रूपये न देता त्यांनी २६ जानेवारी २०१३ रोजी दिले. त्यानंतर बिघाड झाल्याचे कळविल्यावर दुकानातील अभियंत्याला १२ जानेवारी व १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र बाह्मणकर एकदा शेतात तर दुसऱ्यांदा बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांना दूरध्वनीवरून काटा प्रयोग शाळेत आणल्यावरच दुरूस्त होईल किंवा रक्कम परत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी प्रयोगशाळेत काटा आणलाच नाही, असे म्हटले. दोन्ही पक्षांचे कागदपत्रे व युक्तिवाद ऐकूण न्यायमंचाने कारणमीमांसा केली. ब्राह्मणकर यांनी दुरूस्तीची मागणी केल्यावरही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. शिवाय ते अपंग असल्यामुळे कुठे जावू शकत नाही. यावरून कीर्ती इंटरप्रायजेसने सर्व प्रकारे टाळाटाळ करून न्यूनतापूर्ण अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला. शिवाय अभियंत्याला तक्रारकर्ते ब्राह्मणकर यांच्या घरी वजनकाटा दुरुस्तीसाठी पाठविले, ही बाब सिद्ध करण्यासाठी किर्ती इंटरप्रायजेसने अभियंत्याचे शपथपत्र किंवा कोणतेही दस्तऐवज आदी पुरावे दाखल केले नाही. त्यामुळे सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे न्यायमंचाने सांगितले.यावर न्यायमंचाने ग्राहक ब्राह्मणकर यांची तक्रार अंशत: मान्य करून इलेक्ट्रानिक वजन काटा परत घ्यावा व त्याची किंमत चार हजार ४५० रूपये द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानभरपाई म्हणून ती हजार रूपये द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने किर्ती इंटरप्रायजेसच्या संचालकांना दिले. (प्रतिनिधी)