शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरज नसताना डांबरी रस्त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 18:04 IST

शासकीय निधीची उधळपट्टी : चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोहमारा : दोन वर्षांपूर्वी तयार केलेल्या पक्क्या डांबरी रस्त्यावर गरज नसताना सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून शासकीय निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार सध्या सडक अर्जुनी तालुक्यात सुरू आहे. शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत बानटोला ते कोहळीटोला, कोल्हारगाव ते कोसंबी कनेरी ते गोंडउमरी या गावांतर्गत रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. हे रस्ते चांगले असतानाही चालू आर्थिक वर्षात या रस्त्यावर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे.

डांबरीकरणाचे पक्के रस्ते सुस्थितीत असताना सिमेंट रस्त्यांची गरज का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टीच असून, निधीची उधळपट्टी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची दखल घेतात याकडे आता या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रतिनिधींकडून कामाची शिफारसलोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाचा विकास निधी खर्च करीत असतात. स्थानिक विकास निधीबरोबरच शासनाच्या ३०५४//२५१५ या लेखाशीर्षांतर्गत खर्च करावयाच्या निधीसाठी कार्यकर्त्या- कडून कामाची यादी मागवितात. यात सर्वात जास्त रस्ते व नाली बांधकामाची कामे असतात. बरेच कार्यकर्ते हे कंत्राटदार असल्याने अन्य योजनांतून झालेल्या रस्त्याची कामे जास्त मागतात. त्याच कामाला निधी मंजूर होतो. मात्र बांधकाम विभागाकडून सुचविलेल्या कामावर नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे किंवा नाही याची शहानिशा न करता सरसकट अंदाजपत्रक तयार करून बांधकाम करण्याचा सध्या सपाट सुरु असल्याचे चित्र आहे.

एकाच रस्त्याचे वांरवार बांधकामसर्वसामान्य नागरिकाकडून चांगल्या दर्जाचे मजबूत डांबरी रस्त्यावर नव्याने बांधकाम का करतात अशी विचारणा केली असता शासनाकडून रस्ता मंजूर करण्यात आला आहे. आलेला निधी परत जाता कामा नये असे सांगून बांधकाम केले जात असल्याचे उत्तर दिले जाते. ही एकप्रकारे शासकीय निधीची उधळपट्टी असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

कनेरी ते गोंडउमरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचेसार्वजनिक बांधकाम विभाग सडक अर्जुनी अंतर्गत कनेरी ते गोंडउमरीरस्त्यावर सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक ग्रामपंचायत पदाधि- काऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. हा रस्ता दोन महिन्यांतच उखडायला लागला आहे.

रस्ता बांधकामात रोपट्यांची कत्तलसामाजिक वनीकरण विभागा- कडून राज्यमार्ग तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. या विभागाकडून सलग तीन वर्षे रोपट्यांची देखभाल व जोपासना केली जाते. रस्ता बांधकामासाठी लागणारे साहित्य या रोपट्यांवर पडत असल्याने अनेक रोपटे नष्ट झाली आहेत. रस्ते बांधकामात रोपट्यांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Governmentसरकारroad transportरस्ते वाहतूकCorruptionभ्रष्टाचार