शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयावर काँग्रेस-भाजपचा कब्जा

By admin | Updated: July 16, 2015 01:36 IST

गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पुन्हा एकदा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला ठेवून भाजपला साथ देत अध्यक्षपद पदरात पाडून घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हिरमोड : अध्यक्षपदी काँग्रेसच्या उषा मेंढे, तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या रचना गहाणे यांची निवडगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पुन्हा एकदा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला ठेवून भाजपला साथ देत अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. सर्वात कमी १६ सदस्यसंख्या असतानाही काँग्रेसच्या उषा मेंढे अध्यक्षपदी विराजमान झाल्या तर १७ सदस्यसंख्या असलेल्या भाजपच्या वाट्याला उपाध्यक्षपद आले. रचना गहाणे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.जिल्हा परिषदेच्या सभागृहात अतिशय औत्सुक्याच्या, काहीशा तणावपूर्ण आणि नाट्यमय घडामोडींच्या घटनाक्रमात झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीत अखेर सर्वाधिक २० जागा पटकावूनही राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागणार आहे.दुपारी ३ ते ४.३० यादरम्यान जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उषा मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजलक्ष्मी तुरकर तसेच भाजपकडून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी अर्ज भरले होते. तसेच उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पी.जी. कटरे, राष्ट्रवादीकडून गंगाधर परशुरामकर आणि भाजपकडून रचना गहाणे यांनी दुपारी १ वाजेपर्यंत नामांकन भरले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज सुरू झाले त्यावेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी तर उपाध्यक्षपदाच्या शर्यतीतून पी.जी.कटरे यांनी माघार घेतली. दुपारी ३ वाजता निवडणुकीसाठी सभा सुरू होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य २.४० ला सभागृहात दाखल झाले. त्यापाठोपाठ भाजपचे सदस्य २.५५ ला तर काँग्रेसचे सदस्य ३ वाजता सभागृहाच्या दारावर पोहोचले. यावेळी भाजपचे आमदार विजय रहांगडाले, आ.संजय पुराम हेसुद्धा सभागृहाबाहेर उपस्थित होते. या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता उषा मेंढे यांना ३३ तर राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांना २० मते पडली. उपाध्यक्षपदाकरिता भाजपच्या रचना गहाणे यांना ३० तर राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांना २० मते पडली. काँग्रेसचे सदस्य पी.जी.कटरे, विमल नागपुरे आणि रमेश अंबुले यांनी तटस्थ राहून उपाध्यक्षपदाकरिता कोणालाही मतदान केले नाही.या मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. पोलीस बंदोबस्तही चोख होता. (जिल्हा प्रतिनिधी)आता काँग्रेस भाजपाविरूद्ध बोलणार का? आतापर्यंत भाजप सरकारमधील घोटाळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेर काढून त्यांचा चेहरा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप सरकारला धारेवर धरले. पण आता त्याच भाजपसोबत घरोबा करून काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले असून त्या भाजपविरूद्ध आता यांचा आवाज बाहेर निघेल का? अशी शंका या घडामोडीनंतर आयोजित पत्रपरिषदेत आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केली. यावेळी संपूर्ण घटनाक्रमाचा तपशीलही त्यांनी पत्रकारांपुढे मांडला. यावेळी काँग्रेस आणि भाजपात कशी छुपी युती होती आणि त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचाही आदेश त्यांनी कसा झुगारला हे पुराव्यासह सांगण्यात आले. या पत्रपरिषदेला राष्ट्रवादीचे पर्यवेक्षक नरेश माहेश्वरी, माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, गप्पू गुप्ता, बबलू कटरे आदी उपस्थित होते.