शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लढ्यासाठीच्या साहित्य खरेदीत घोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने टेबलेट सॅनिटायजर मशीन ७०० ते १००० मिली खरेदीचे कंत्राट नागपूरच्याच कंपनीला दिले. ही मशीन बाजारात दोन-तीन हजार रूपयांना मिळत असताना सहा हजार ८०० रूपयांप्रमाणे सहा लाख १२ हजार रुपयांच्या मशीन खरेदी करण्यात आल्या. यात १२ पुरवठादारांनी भाग घेतला होता. परंतु नागपुरातील त्या ४ कपन्यांपैकी एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले.

ठळक मुद्देसर्व कंत्राट नागपूरच्याच नावाने : दुप्पट किंमतीत अनेक साहित्य खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेम या ऑनलाईन अ‍ॅपवरून निविदा मागविल्या होत्या. परंतु गोंदिया जिल्ह्यातील कोणत्याही कंत्राटदाराला याचे काम मिळू नये म्हणून आरोग्य विभागाने जाचक अटी लादल्या. परिणामी हेतूपुरस्सर नागपूर येथील ४ कंपन्यांना हे साहित्य पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. यात अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याची चर्चा आहे.काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने टेबलेट सॅनिटायजर मशीन ७०० ते १००० मिली खरेदीचे कंत्राट नागपूरच्याच कंपनीला दिले. ही मशीन बाजारात दोन-तीन हजार रूपयांना मिळत असताना सहा हजार ८०० रूपयांप्रमाणे सहा लाख १२ हजार रुपयांच्या मशीन खरेदी करण्यात आल्या. यात १२ पुरवठादारांनी भाग घेतला होता. परंतु नागपुरातील त्या ४ कपन्यांपैकी एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. व्हीटीएम किट स्वाईन फ्यू करीता स्वॉब घेण्यासाठी लागणाºया २५ हजार किटचा पुरवठा करण्याचे कंत्राट नागपूर येथील ४ पैकी एका कंपनीलाच देण्यात आले. बाजारात ७० ते ८० रूपयांना मिळणारी ही किट १४४ रूपये प्रति दराने खरेदी करण्यात आली. यात १५ लोकांनी निविदा भरल्या होत्या. परंतु नागपूरच्याच कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. ३६ लाखात या किट खरेदी करण्यात आल्या.इन्फ्रारेड थर्मामीटर १२९९ नग पुरवठयाचे कंत्राट सुद्धा नागपूरच्याच कंपनीला देण्यात आले. यात २३ लोकांनी निविदा भरल्या होत्या. बाजारात ८०० ते ९०० रूपये किंमतीला मिळणारे हे इन्फ्रारेड थर्मामीटर २६०० रूपये प्रति नग प्रमाणे खरेदी करण्यात आले. त्यावर ३३ लाख ७७ हजार ४०० रूपये खर्च करण्यात आले. पल्स ऑक्सीमीटर १३७९ नग पुरवठा करण्याचे कंत्राट नागपूरच्या कंपनीला देण्यात आले.आठ लाख १३ हजार ६०० रूपयाचे हे पल्स आॅक्सीमीटर खरेदी करण्यात आले.एक पल्स ऑक्सीमीटर ५९० रूपयांना पडला आहे. यात मोठ्या प्रमाणात रक्कम कमविण्याच्या नादात तर नागपूरच्या कंपन्यांना साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट तर दिले नाही ना अशी चर्चा आहे.साहित्यासाठी ५ वर्षांचा अनुभव कशाला?स्थानिकांना डावलून नागपूरच्याच कंपन्यांना कंत्राट देणे ही बाब आरोग्य विभागावर संशय निर्माण करणारी आहे. हे साहित्य पुरवठा करताना मागील ५ वर्षांचा अनुभव मागणे हे चुकीचे आहे. साहित्य पुरविण्यासाठी शासकीय कार्यालयांना ५ वर्षांचा अनुभव असावा ही अट म्हणजे जाणून बुजून जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला याचा कंत्राट मिळू नये यासाठी पद्धतशिरपणे करण्यात आलेला हा कट असल्याचे बोलले जात आहे.

‘त्या’ औषध निर्माण अधिकाऱ्याची दलाली४गोंदिया जिल्हा परिषदेत असलेल्या एका औषध निर्माण अधिकाऱ्याच्या आयडीवरून नागपूर येथील त्या ४ कंत्राटदारांच्या निविदा अनेकदा भरण्यात आल्या आहेत. तीन लाखांपेक्षा कमी कामांची निविदाही प्रकाशित करावी लागत नाही. त्यासाठी तीन लाखांपेक्षा कमी कामे याच कंपन्यांना यापूर्वीही देण्यात आली आहेत. ती सर्व कामे त्या औषध निर्माण अधिकाऱ्याच्या आयडीवरून करण्यात आली. याचाच अर्थ त्या औषध निर्माण अधिकाऱ्याची त्या कंपन्यांसोबत साठगाठ आहे असे आता बोलले जात आहे.सॅनिटायजर मशीनचे कंत्राट देण्यात आले. उर्वरीत साहित्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाही. नियमाप्रमाणेच ज्यांचे कमी दर होते त्यांनाच कंत्राट देण्यात आले. मागितलेल्या कागदपत्रांची ज्यांनी पूर्तता केली त्यांच्या नावाने निविदा निघेल.-डॉ. श्याम निमगडेजिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या