शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

परीक्षा घेणारेच पेपर फोडतात; मग विश्वास ठेवायचा कुणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 16:54 IST

शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे टीईटी परीक्षेतील घोळ उघड : विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम

गोंदिया : शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय शिक्षक होता येत नसल्याने, अनेकांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी डीएड, बीएड करणारे लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, विद्यार्थ्यांत रोषाचे वातावरण आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीईटी दोन वर्षांपासून रखडली होती. अखेर २१ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेत गैरव्यवहार झाल्याने तुकाराम सुपेला पोलिसांनी अटक केली. आता शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. प्राथमिक स्तरावरील पेपर-१ व माध्यमिक स्तरावरील पेपर-२ साठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साडेतीन लाख आहे.

टीईटीसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी

३ लाख ४३ हजार

परीक्षा केंद्रे १४४३

पहिल्या पेपरसाठी केलेली नोंदणी २ लाख ५४ हजार ४२८

परीक्षा दिलेले २ लाख १६ हजार ६०४

दुसऱ्या पेपरसाठी नोंदणी केलेले २ लाख १४ हजार २५०

परीक्षा दिलेले १ लाख ८५ हजार ४३९

दोन वर्षांनी परीक्षा, त्यातही घोळ

राज्यात २०१३ पासून सहा वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे परीक्षा झाली नव्हती. त्यानंतर २१ नोव्हेंबरला दोन सत्रांत परीक्षा झाली. गैरप्रकार रोखण्यासाठी कार्बनलेस उतरपत्रिका वापरण्यात आल्या होत्या. मात्र, आता या परीक्षेत खुद्द आयुक्तांनीच घोळ निर्माण केल्याने आमचे काय? हा प्रश्न आहे.

आमचा काय दोष?

काेरोनामुळे टीईटी परीक्षा झाली नव्हती. आता ही परीक्षा दिली असून पेपरफुटी प्रकरणात जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई होईलच, पण यात आमचा काय दोष, आता आमचं काय, त्यावर तोडगा काढून शासनाने आम्हाला दिलासा द्यावा.

शीतल देशमुख, विद्यार्थिनी.

पेपर फुटला हे आम्हाला माहिती नाही. आम्ही अभ्यास करून परीक्षा दिली. अपात्र उमेदवारांच्या निकालात फेरफार करून पात्र ठरवले असेल, तर मेहनतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. असे ८०० उमेदवार अपात्र असल्याचे ‘लोकमत’च्या १९ डिसेंबरच्या वृत्तपत्रात वाचले. त्यांचा निकाल बदलला त्यावर कारवाई करावी, आमची चूक नसून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

सुनीता बोबडे.

२०२० मध्ये १६५९२ विद्यार्थी पात्र ठरले. उर्वरित विद्यार्थी व नवीन विद्यार्थी पुन्हा २०२१ च्या परीक्षेला बसले. मात्र, आता शिक्षकांच्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याने अनेक प्रश्न फुटले. आमच्या सारखेच गरीब विद्यार्थ्यांचे नशीबच फुटले. शिक्षक होण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार का? असा प्रश्न पडला आहे.

चंदा हरिभाऊ पवार.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीexamपरीक्षा