सालेकसा : सालेकसा तालुक्यातील कचारगड (धनेगाव) येथील पारी कोपार लिंगो- मॉं काली कंकाली देवस्थानात आयोजित पाच दिवसीय राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन व कोया पुनेम संमेलनाची थाटात सांगता करण्यात आली. ३१ जानेवारीपासून महाधिवेशन व यात्रेला मोठ्या थाटात प्रारंभ झाला होता. आदिवासीबांधवांचे आद्य दैवत असल्याने देशभरातून आदिवासी भाविक या यात्रेत सहभागी होऊन देवताचे दर्शन घेतात. कचारगड यात्रा म्हणून या यात्रा व संमेलनाची ख्याती आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गुहेत देवतांचे स्थान असून ही गुहा कचारगडची गुहा म्हणून ओळखली जाते. दरवर्षीनुसार या यात्रेत देशभरातून लाखो भाविकांनी भाग घेत आपल्या आद्य देवतांचे दर्शन घेतले. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता या यात्रेचा समारोप करण्यात आला. समारोपप्रसंगी माजी आमदार रामरतन राऊत, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने, जिल्हा अन्य व पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, तहसीलदार व उप जिल्हाधिकारी सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रल्हाद भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मडावी, ट्रस्टचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, उपाध्यक्ष रमणलाल सलाम, सचिव संतोष पंधरे, सदस्य गोपालसिंग उईके, कोषाध्यक्ष बारेलाल वरकडे, रामेश्वर पंधरे, सुरेश परते, केजुलाल भलावी, शकुंतला परतेती, चैनसींग मडावी, टी.के.मडावी, पर्वतसिंग कंगाली प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष कोकोडे यांनी प्रास्तावीकात या महाधिवेशन व यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे तसेच शासकीय यंत्रणेचे सहकार्याबद्दल आभार मानले. (शहर प्रतिनिधी)
महाधिवेशन व कोया पुनेम संमेलनाची सांगता
By admin | Updated: February 8, 2015 23:35 IST