शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धान उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:12 IST

मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मागील वीस दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस झाला नाही. परिणामी धानाच्या बांध्यामध्ये भेगा पडल्या आहेत. काही शेतकºयांची पावसाअभावी रोवणी खोळंबली आहेत. मागील वर्षी सुध्दा दुष्काळ पडला होता. त्यानंतर यावर्षीही तशीच स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी रोवणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने धान पिक धोक्यात आले आहे. तिरोडा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. मात्र पावसाअभावी शेतात भेगा पडल्या असून धान वाळत चालल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांना धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळते, त्यांच्यावर सुध्दा संकट ओढावले आहे. शेतातील धान पिक पिवळे पडत आहे. परिसरातील ८० ते ८५ टक्के रोवणी झालेली असून १५ ते २० टक्के रोवणी शिल्लक आहेत. ढगाळ वातावरणामुळे धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव सुध्दा वाढण्याची शक्यता आहे. विजेचा पुरवठा अनियमित होत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. यावर्षी हवामान विभागाने चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती