शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ नागरिकांचा विषय ग्रामसभेत घेण्याची सक्ती

By admin | Updated: September 11, 2014 23:37 IST

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि २७ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे विषय ग्रामसभेत मांडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.

मिळणार दिलासा : सरपंच-ग्रामसेवकांना निर्णयाची जाणीवच नाहीैहुपराज जमईवार - परसवाडामहाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि २७ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे विषय ग्रामसभेत मांडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडली जावी हा उद्देश आहे. परंतु अनेक सरपंच आणि ग्रामसेवकांना या निर्णयाची जाणीवच नसल्याची माहिती पुढे आली आहे.जात, वंश, लिंग, शिक्षण, आर्थिक दर्जा अशा कोणत्याही बाबीचा विचार जेष्ठ नागरिकांचा दर्जा देताना विचारात घेतला गेलेला नाही. जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर समस्यांचे गावपातळीवर निराकरण होण्यासाठी जेष्ठ नागरिकांचा विषय ग्रामसभेत सुचीवर घेण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींला परिपत्रक, सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. शासन परिपत्रकात जेष्ठ नागरिकांना घरघुती हिंसाचारापासून जेष्ठ नागरिकांचे संरक्षण केले जावे, जेष्ठ नागरिकांसाठी काम करणारे संघ, बिगर सरकारी संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, आणिबाणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा, आवश्यक सूचना अथवा सुरक्षाविषयक मदत मिळावी. जाणीव, जागृती घेऊन जेष्ठ नागरिकांप्रती सहानुभूती वाढावी म्हणून जेष्ठ नागरिकांचा विषय वर्षातील ४ पैकी किमान दोन ग्रामसभेत ठेवण्यात यावा व जेष्ठ नागरिकांच्या कल्याणाची ग्रामसभेत चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात यावे असे परिपत्रकात नमुद आहे. तसेच वृध्द नागरिकांसाठी समुपदेशक केंद्र बनवणे, त्याच्या आरोग्याची नियमित चाचणी/तपासणी देखभाल करणे, त्यांच्या वैयक्तिक जीवनातील ताणतणावाला जेष्ठ नागरिकांना सक्षमपणे तोंद देता यावे, गृहनिर्माण योजनांमध्ये जेष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सुविधा उपलब्ध करून देणे, जेष्ठ नागरिकांचा चरितार्थ चालविण्यासाठी अधिनियम २००७ तसेच त्यांच्याअंतर्गत २३ जून २०१० च्या अधिसुचनेनुसार राज्यात लागू झालेल्या नियतम २०१० मधील तरतुदीची अंमलबजावणी करून जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून खर्च देण्याची तरतुद केली आहे. जेष्ठ नागरिक एकाकी राहात असतील अशा जेष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी ग्रामसभेत ठेवण्यात यावी, ती जाहीर करावी, जेष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीकडे माहिती अद्ययावत ठेवावी, घरगुती हिंसाचारापासून कलह, तंटे यापासून जेष्ठ नागरिकांचे सरंक्षण केले जाते याची माहिती देणे, आणिबाणीच्या वेळी जेष्ठ नागरिकांना तत्काळ आरोग्य सेवा, सुरक्षाविषयक मदत देण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. सर्व ग्राम पंचायतीनी याबाबतचा आढावा पंचायत समितीच्या मासिक सभेत सुध्दा घेण्यात यावा, असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणीच सुरू झालेली नाही. त्यामुळे याबाबतही माहितीसुद्धा कोणाला नसल्याचे परिसरात दिसून येत आहे.