सडक-अर्जुनी : दिवाणी व कनिष्ठ न्यायालयात शनिवारी(दि.१२) घेण्यात आलेल्या महालोक अदालतमध्ये २० प्रकरणाची तडजोड करुन प्रकरणे निकाली काढण्यात आली.येथील न्यायालयात महा लोकअदालत घेण्यात आली. या लोकअदालतीमध्ये तालुक्यातील विविध प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी देना बँकेची ६ प्रकरणे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची ६ प्रकरणे, बँक आॅफ महाराष्ट्रचे एक प्रकरण, गुन्हेगारी ६ प्रकरण व दिवाणी प्रकरण एक अशा एकूण २० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.न्यायालयातील लोक अदालतीचे अध्यक्ष न्यायाधीश विशाल साठे, पॅनलचे सदस्य आर.के. भगत, वकील संघाचे सदस्य सुरेश गिऱ्हेपुंजे, तसेच न्यायालयातील वकील बन्सोड, राऊत, गहाणे उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश साठे यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना महालोक अदालतचे महत्व समजवून सांगितले. भांडणापेक्षा समझोता बरा. न्यायालयात येऊन आपला वेळ आणि अधिकचा पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्या केसेसची तडजोड करुन तानतणावापासून मुक्त व्हा त्याकरिता आपण समजदारीने तडजोक करा असे आवाहन केले. त्यानंतर तडजोडीने २० प्रकरने निकाली काढण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
लोक अदालतीत २० प्रकरणांची तडजोड
By admin | Updated: November 16, 2016 01:22 IST