शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गोंदिया ते नागभीड रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:52 IST

गोंदिया-नागभीड दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे कार्य आता पूर्ण झाले आहे.

प्रयोग यशस्वी : १४ डब्यांची रेल्वे धावलीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-नागभीड दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे कार्य आता पूर्ण झाले आहे. आता रेल्वे प्रशासन गोंदिया-बल्लारशाह मार्गावर गोंदिया-नागभीड रेल्वे स्थानकांदरम्यान विद्युत इंजिन लावून ट्रेन संचालित केली जात आहे. परंतु या तारखेची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. परंतु रेल्वे प्रशासनाची तयारी पाहून विद्युतवर धावणारी ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.गोंदिया-बल्लारशहा दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे कार्य मार्च २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सदर काम आतासुद्धा पूर्ण झालेला नाही. परंतु रेल्वे प्रशासनाने नागभीडपर्यंत काम पूर्ण झाल्यावर विद्युत इंजिन लावण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. १४ जून रोजी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बिलासपूर मुख्यालयातून १४ कोचची पूर्ण ट्रेन घेवून गोंदियाला पोहोचले. त्यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी होते. हे सर्व अधिकारी ती ट्रेन घेवून नागभीडला पोहोचले. त्यांच्यासह ट्रायल ट्रेनचा प्रवास दुपारी २.३० वाजता गोंदियावरुन सुरू झाला होता. जवळपास दोन तासात १४ बोगींची ही ट्रेन गोंदिया रेल्वे स्थानकावर कोणत्याही समस्येविना पोहोचली. अशाप्रकारे विद्युत इंजिनचा ट्रायल यशस्वी ठरला. मागील चार दिवसांपासून रेल्वेचे स्थानिक अधिकारी या ट्रायलला यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र एक करीत होते. आता लवकरच विद्युत इंजिन लागल्याने रेल्वेचा हा प्रवास सुलभ होईल व रेल्वे प्रवासी आपल्या गंतव्यापर्यंत आता पूर्वीपेक्षाही लवकर पोहचू शकतील.सौंदड रेल्वे स्थानकाचे निरीक्षण सौंदड येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेचे सीआरएस व डीआरएम यांनी रेल्वे विद्युतीकरणाची १२ जून रोजी पाहणी केली. १२, १३ व १४ जून रोजी रात्री ३.४० वाजताच्या दरम्यान विद्युतवर चालणाऱ्या रेल्वेगाडीची ट्रायल घेण्यात आली. झालेल्या कामाच्या पाहणीसाठी सिकंदराबाद येथील मुख्य सुरक्षा आयुक्त (कमिश्नर आॅफ रेल्वे सेफ्टी) रामकृष्ण यादव यांनी सौंदड रेल्वे स्थानक, गोंदिया-बल्लारशाह मार्गावरील रेल्वे स्थानक व विद्युतीकरणाची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासह डीआरएम अमितकुमार अग्रवाल, वरिष्ठ मंडळ संरक्षण अधिकारी ए. मसराम, सहायक मंडळ प्रचालन व्यवस्थापक गोपी क्रिष्णन, सौंदडचे स्थानक व्यवस्थापक एस.एस. चंदनखेडे उपस्थित होते. त्यांनी अडीज हजार व्होल्टेज लाईनचे निरीक्षण केले.नागभीडपासून डिझेल इंजिनच्या व्यवस्थेची गरजविद्युत इंजिनची गोंदियात कसलीही समस्या नाही. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया डेपोमध्ये विद्युत इंजिन कमी नाहीत. मात्र गोंदिया ते नागभीडपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने नागभीड येथे डीझेल इंजिनची व्यवस्था करावी लागेल. मात्र रेल्वे प्रशासनासाठी ही मोठी समस्या नाही.भविष्यात कोणते लाभ होणार?एकीकडे जबलपूरपर्यंत ब्रॉडगेज लाईनचे काम पूर्ण होत आहे, तर दुसरीकडे चंद्रपूरपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल तर उत्तर भारतासह दक्षिण भारत गोंदियाच्या माध्यमाने आपसात जुळेल. याला रेल्वे विभागाकडून मोठ्या शक्यतेच्या स्वरूपात बघितले जात आहे. यात अडचण केवळ एवढीच आहे की गोंदिया-बल्लारशहापर्यंत एकेरी (सिंगल) रेल्वे लाईन बनली आहे. दुसरी रेल्वे लाईन घालण्याची आवश्यकता आहे.