म.ग्रा. रोजगार हमी योजना : प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणीचे फलितगोंदिया : महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे ग्रामीण भागातील मजुरांचा आर्थिक विकास साधणारी योजना आहे. कामाच्या शोधात गावातील मजूर गाव सोडून शहरामध्ये येतात. अशा वेळी त्यांच्या गावातच त्यांना रोजगार देवून मजुरांचे स्थलांतर थांबवणे हे या योजनेचे मुख्य उदिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करीत असतातना गावामध्ये मजुरांना काम व रोजगार उपलब्ध होतो. जिल्ह्यात रोजगाराचे उद्दीष्ट ३ महिन्यात ६३ टक्के पूर्ण केले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेंतर्गत मजुरांना वर्षभर रोजगाराची हमी मिळते. गावात पायाभूत सुविधांचा विकास होतोे. या योजनेतुन झालेल्या कामामुळे गाव स्वयंपुर्ण होते तसेच मजुरीची प्रदाने ९ पीएमएस प्रणालीद्वारे मजुरांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.मग्रारोहयोअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामामध्ये माझं शेत, माझं माझ काम अशा प्रकारच्या कामाचा समावेश होतो. त्यामध्ये सिंचन विहिरी, शौचालये, गायी व शेळ्यांचा गोठा, शेत तळे, कृषि विषयक कामे जसे की, नॅडप कंपोस्टिंग, गांडूनळ खत व अमृतपाणी, शेतीची बांध बंदिस्ती व दुयस्तीची कामे याचा अंतर्भाव होतो. सार्वजनिक लाभाच्या कामांतर्गत वनीकरण, वृक्षलागवड, शेतरस्ते, पांदण रस्ते, जलसंधार/संवर्धन कामे, गाळ काढणे, गाव नाला दुरुस्ती, राजीव गांधी सेवा मदत केंद्र, सिमेंट रस्ते व क्रिडांगणाची कामे यासारख्या बाबींचा समावेश होतो.या योजनेंतर्गत वर्ष एप्रिल २०१४ पासून जिल्ह्यात चौतीस हजार मजुरांना काम देण्यात आले आहे. मगांराग्रारोहयो दिनांक १ जुलै २०१४ रोजी ग्रामपंचायत स्तर व यंत्रणास्तरावर ११ हजार ६१४ एवढी मजूर उपस्थिती होती. त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील १२९ कामांवर ३ हजार १८९ मजूर, गोरेगाव तालुक्यातील ५१ कामांवर १ हजार १४ मजूर, तिरोडा तालुक्यातील ४९ कामांवर ६२६ मजूर, आमगाव तालुक्यातील ९७ कामांवर १ हजार ६६२ मजूर, सालेकसा तालुक्यातील ८६ कामावर १ हजार ६५९ मजूर, देवरी तालुक्यातील ८४ कामांवर ९१७ मजूर, सडक/अर्जुनी तालुक्यातील ११८ कामांवर १ हजार ८६२ मजूर, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २२ कामांवर ५८५ मजूर उपस्थित असून या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांकरीता जिल्ह्यातील एकुण ६३६ काम करण्यात येत असून ११ हजार ६१४ मजूर काम करीत आहेत.या योजनत वर्ष २०१३-१४ निहाय प्रगतीचा आढावा घेत असता वर्ष २०१३-१४ मध्ये आमगाव, अर्जुनी/मोरगाव, देवरी, गोंदिया, गोरेगाव, सडक/अर्जुनी, सालेकसा, तिरोडा मिळून ४० लाख ८७ हजार मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जे ३२ लाख २७ हजार १२७ हजार १४५ झाले म्हणजेच ८७,९६ टक्के उद्दिश्ट पुर्ण करण्यात आले.वर्ष २०१३-१४ अंतर्गत प्रगती पहाता नियोजन व अंमलबजावणी मध्ये सुधारणा करण्यात आली व जिल्हा प्रशासनातील प्रमुख जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व गोंदिया जि.प. चे मुख्यकार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे यांनी काटेकोरपणे व नियोजबद्ध पद्धतीने योजनेची अमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत व त्या उपक्रमाला यशही मिळाले. लेबर बजेट आर्थिक वर्ष २०१४-१५ नुसार प्रगतीचा आलेख हा योग्य नियोजनामुळे अंचावलेला दिसतो. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये आमगाव तालुक्यात ३ लाख ६६ हजार १०० मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे ६३,४१ टक्के कामपुर्ण असून अर्जुनी/मोरगाव तालुक्याला ५ लाख १९ हजार ६०० मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे ५१.०२ टक्के, देवरी तालुक्यातील ५ लाख ७६ हजार ५०० मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे ५५.६० टक्के, गोंदिया तालुक्यातील ६ लाख ७३ हजार ६०० मनुष्य दिवस निर्मिती दिवस करण्याचे ६०, २० टक्के, गारेगाव ३ लाख २५ हजार २०० मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे ३६.३२ टक्के, सालेकसा येथे २ लाख ७८ हजार ४०० व काम करण्याचे ७४.९९ टक्के, तिरोडा ४ लाख ९४ हजार ५०० व ६७.९४ टक्के उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले आहे. एकुण ३५ लाख ४७ हजार ३०० मनुष्य दिवस निर्मितीचे ८ जुलै २०४ पर्यंत ६३ टक्के उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले आहेत.आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये या योजनेंतर्गत ३२ करोड ६६ लाख १४ हजार रुपये एकुण खर्च करण्यात आला आहे. योजना राबविण्याच्या १ एप्रिल २०१४ ते जुलै२०१४ पर्यंत झालेले ६३ टक्के काम हे अवघ्या ३ महिन्यांमध्ये झाले आहे. हे योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणीचे फलित आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तीन महिन्यात ६३ टक्के उद्दिष्ट पूर्ण
By admin | Updated: July 12, 2014 23:43 IST