शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीतून १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:46 IST

आमगाव-देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून मागील चार वित्तीय वर्षात एकण १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर मात : आमगाव, सालेकसा व देवरी तालुका

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आमगाव-देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून मागील चार वित्तीय वर्षात एकण १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आमगाव-सालेकसा आणि देवरी तालुक्यातील शेकडो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.यंदा पाणी टंचाईची समस्या सुद्धा जास्त जाणवली नाही. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या बोअरवेलीची मोठी मदत होत आहे.सालेकसा व देवरी तालुक्यात २०१४-१५ या वर्षात मार्चपूर्वी १२ बोअरवेल प्रस्तावित केले. यात सालेकसा तालुक्यात आठ आणि देवरी तालुक्यात चार बोअरवेल मंजूर करण्यात आले. २०१५-१६ या वित्त वर्षात आमदार निधीतून सालेकसा तालुक्यात २९, देवरी तालुक्यात ४१ आणि आमगाव तालुक्यात २६ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या. २०१६-१७ च्या वित्तीय वर्षात सालेकसा तालुक्यात १६, देवरी तालुक्यात चार आणि आमगाव तालुक्यात १२ बोअरवेल देण्यात आलेत. तसेच २०१७-१८ या वित्तीय वर्षात सालेकसा तालुक्यात १७, देवरी तालुक्यात २१ आणि आमगाव तालुक्यात १४ बोअरवेल मंजूर करण्यात आल्या.एकंदरीत मागील चार वित्त वर्षात सालेकसा तालुक्यात ७०, देवरी तालुक्यात ७० आणि आमगाव तालुक्यात ५२ बोअरवेल देण्यात आल्या आहेत. या सर्व बोअरवेलचे खोदकाम पूर्ण होवून बोअरवेल तयार करण्यात आले. त्या बोअरवेलचा उपयोग नागरिक करीत आहेत. तिन्ही तालुक्यातील एकंदरीत १९२ बोअरवेलपैकी काही एकदोन बोअरवेलचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी पुरेसा पाणीसाठा लागला असून भर उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत होते. मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने गावातील नागरिकांना दुष्काळी व पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या बोअरवेलमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली.सात ठिकाणी मल्टीस्टेज वाटर ट्रीटमेंट युनिटआमदार निधीतून विधानसभा क्षेत्रात एकूण सात ठिकाणी मल्टीस्टेज वॉटर ट्रीटमेंट युनिट लावण्यात आले. यात सालेकसा तालुक्यात तीन, देवरी तालुक्यात तीन आणि आमगाव तालुक्यात एक युनिटचा समावेश आहे. सालेकसा तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळा बिजेपार, जि.प. प्राथमिक शाळा दरेकसा आणि जि.प. प्राथमिक शाळा रामाटोला येथे, देवरी तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळा मिसपिरी, जि.प. प्राथमिक शाळा पालांदूर आणि जि.प. प्राथमिक शाळा फुटाणा तसेच आमगाव तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे युनिट लावण्यात आले.६४ बोअरवेल प्रस्तावितआमदार निधीतून चालू वर्षात पुन्हा ६४ बोअरवेल प्रस्तावित असून यात सालेकसा २४, देवरी १६ आणि आमगाव तालुक्यात २४ बोअरवेल प्रस्तावित असून अनेक बोअरवेलचे कामे सुरु झालेली आहेत.

टॅग्स :Waterपाणी