शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जलयुक्त शिवारची १९२ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:30 IST

राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, यावर विशेष भर दिला आहे.

ठळक मुद्देभूजल पातळीत वाढ : शेतीला सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, यावर विशेष भर दिला आहे.जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने लघु पाटबंधारे विभाग जि.प., वनविभाग, जलसंधारण व पंचायत समिती अशा विविध यंत्रणेच्या माध्यमातून कामे केली जातात. जि.प.अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यात २७५ कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. त्यानुरुप २१६ कामे सुरु करण्यात आली असून १९२ कामे पूर्ण झाली आहेत. तर २४ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील २३४ गावांचा समावेश करण्यात आला.त्यानुरुप सन २०१८-१९ या वर्षात १६५ गावात जलयुक्त शिवारची कामे घेण्यात आली.यामध्ये जी गावे जलयुक्त शिवारमध्ये समावेशित करण्यात आली होती. त्या गावात जलसंधारणची कामे घेण्यात आली. यामध्ये पहिल्या वर्षी ९४ गावे दुसऱ्या वर्षी ७७ त्यानंतर ६३ गावे व सन २०१८-१९ मध्ये १६५ गावे समाविष्ट करण्यात आली होती. अभियानाच्या माध्यमातून जी कामे करण्यात आली. त्यानुरुप जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात जि.प.अंतर्गत २७५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातंर्गत २१६ कामे सुरु करण्यात आली तर १९२ कामे पूर्ण झालीत.यामध्ये आमगाव तालुक्यात ४३ कामे सुरु करण्यात आली, यापैकी ४१ कामे पूर्ण झाली आहेत. तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात २ पैकी १, देवरी तालुक्यात १० पैकी ४, गोंदिया तालुक्यात ७७ पैकी ६९, गोरेगाव तालुक्यात ४३ पैकी ३९, सडक अर्जुनी तालुक्यात ८ पैकी ६, सालेकसा तालुक्यात २० पैकी २० तर तिरोडा तालुक्यात १३ पैकी १२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर ५ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर २४ कामे प्रगतीपथावर असून ही कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहेत. एकूणच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत जी कामे करण्यात आली. यामध्ये भातखाचरची १३३ कामे, तलावाची ४० कामे तर नाल्या सरळीकरणाची १९ असे एकूण १९२ कामे पूर्ण झाली आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार