गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या सरांडी येथील रेती चोरून नेणाऱ्या टॅ्रक्टर चालकावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.टॅ्रक्टर चालक राधेश्याम हेमराज सोनवाने व मालक लेकचंद विठ्ठलसाव कावळे दोन्ही रा. बिर्सी असे आरोपींचे नाव आहे. ते दोघेही एम एच ३५ जी १६७० मध्ये तीन हजार २०० रूपये किंंमतीची एक ब्रास रेती वाहून नेत असताना मंडळ अधिकारी सोपान धोडीराम खुंडरे (५८) यांनी तो ट्रॅक्टर पकडला. तिरोडा पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अपघातात एक जखमीबघेडा भवानीटोला येथील फंदू इसना शेंडे (६२) हे रस्ता अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेचा विनयभंगडुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोहळीटोला आदर्श येथील एका २० वर्षाच्या महिलेचा विनयभंग परसोडी येथील विकास उदाराम शेंडे (३६) याने ३ फेब्रुवारी रोजी केला. त्याच्या विरूध्द डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ (अ) ५०९, ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.मोबाईल व लॅपटॉप पळविलारामनगरच्या धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाजवळील देवेंद्र सुरेश तिवारी (२७) यांच्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी गुरूवार ते शुक्रवारी रात्री १८ मोबाईल व लॅपटॉप पळवून नेला. चोरण्यात आलेले मोबाईल व लॅपटॉप असा एकूण ४७ हजार ५०० रूपयांचा माल आहे. सदर घटनेसंदर्भात अज्ञात चोरट्यांविरूध्द रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.चालकावर गुन्हा दाखलसार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत चारचाकी वाहन उभे करणाऱ्या एकावर रामनगगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कामठा येथील भोजराज रामजी मेंढे (४६) याने सुमो २९ एफ ००६४ रस्त्यावरच उभी करून ठेवली होती. आरोपीविरूध्द रामनगर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चार दारूव्रिक्रेत्यांवर गुन्हा तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील प्रल्हाद जीवनराम तांडेकर (५५) व विनोद बाबुलाल बरईकर (३६) यांच्या दारूभट्टीवर धाड घालून सात लीटर हातभट्टीची दारू, २२५ किलो मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. भीमराव श्रीराम झाडे (४२) याच्याकडून ३९० मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य असा भीमराव कडून १३ हजार ६२५ रूपयाचा माल जप्त करण्यात आला. श्यामराव श्रीराम झाडे (३६) याच्याकडून २५ लीटर हातभट्टीची दारू, ४५० किलो मोहफुल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर आरोपीं कडून ३२ हजार २५० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द तिरोडा पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
रेती चोरणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
By admin | Updated: February 16, 2015 00:02 IST