शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाचे जल्लोषात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:24 IST

सुखसमृद्धीचे देवता गणरायाचे गुरूवारी (दि.१३) जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात नाचतगात गणरायांना नेताना मोठ्या प्रमाणात भाविक व सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते दिसून येत होते. गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी सकाळपासून नागरिकांची ये-जा सुरू होती. यासाठी मूर्तीकारांकडे नागरिकांची एकच गर्दी लागून होती.

ठळक मुद्देमूर्तिकारांकडे एकच गर्दी : सकाळपासूनच निघाले गणराज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुखसमृद्धीचे देवता गणरायाचे गुरूवारी (दि.१३) जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात नाचतगात गणरायांना नेताना मोठ्या प्रमाणात भाविक व सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते दिसून येत होते. गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी सकाळपासून नागरिकांची ये-जा सुरू होती. यासाठी मूर्तीकारांकडे नागरिकांची एकच गर्दी लागून होती. राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव जिल्ह्यासह शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जिल्ह्यात सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणरायांच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती.गणेश मंडळांकडून मूर्ती व मंडप उभारण्यासाठी धावपळ सुरू होती. तर घराघरांत गणराय येणार असल्याने बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वाट पाहत होते. अखेर गुरूवारी (दि.१३) गणरायांच्या आगमनाचा दिवस उजाळला. सकाळपासूनच सायकल, दुचाकी व चारचाकींत लाडके गणराज नेताना भाविक दिसून येत होते. तर दुपारनंतर सार्वजनिक मंडळांकडून मुर्ती घेऊन जाण्यास सुरूवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात तरूण नाचत-गात व जयघोष करीत गणरायांना आपल्या स्थानी घेऊन जाताना दिसले.पोलिसांचा बंदोबस्तगणेशोत्सवादरम्यान काही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागही सज्ज आहे. पोलिस विभागाकडून प्रत्येक मंडळाला पोलीस कर्मचारी व होमगार्ड दिले जाणार आहेत. शिवाय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून तेही नजर ठेवून राहणार आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Policeपोलिस