शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

दिलासादायक ! दोन नवीन कोरोना बाधितांची भर, तर आठ रुग्णांची सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 5:00 AM

गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १, तर इतर जिल्हा व राज्यातील २ रुग्ण आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात आता ५२ क्रियाशील रुग्ण : मात्र सतर्कता बाळगण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावताना दिसत असतानाच जिल्ह्यात मात्र कोरोना नियंत्रणात आहे. यामुळेच गुरुवारी (दि.१८) जिल्ह्यात २ नवीन बाधितांची भर पडली असून आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४,३०८ एवढी झाली असून, १४,०७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता ५२ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उरले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १, तर इतर जिल्हा व राज्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, राज्यात कोरोना पुन्हा फोफावत असून, याकडे लक्ष देत राज्य शासनाकडून पुन्हा काही निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातही त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात फोफावत असतानाच विदर्भाला केंद्रीय समितीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशात जिल्ह्यात जरी कोरोना नियंत्रणात असला तरीही जिल्हावासीयांनी आता आणखी सतर्कतेने वागण्याची गरज आहे. यासाठी मास्कचा नियमित वापर, शारीरिक अंतराचे पालन व वारंवार हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अंमल करावाच लागणार आहे. चाचण्या वाढविण्यावर भर कोरोनाचा उद्रेक बघता आता जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, चाचण्या वाढविल्या जाणार आहेत. तर आतापर्यंत १,३५,९९९ चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. यामध्ये ६८,५४२ आरटी-पीसीआर चाचण्या असून त्यात ८,४४६ पॉझिटिव्ह, तर ५६,८४६ चाचण्या निगेटिव्ह आहेत. तसेच ६७,४५७ रॅपीड ॲंटिजेन चाचण्या असून, यातील ६,१५७ पॉझिटिव्ह, तर ६,१३०० चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मास्क लावा अन्यथा दंड राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता मास्क व लावणाऱ्यांना थेट दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश काढले असून, मास्क व लावता फिरणाऱ्यांना १०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा उद्रेक आता अत्यंत धोकादायक ठरणार आहे. अशात नागरिकांनी पैसे वाचविण्यासाठी नव्हे तर आपला जीव वाचविण्यासाठी मास्क लावणे गरजेचे झाले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू