शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

दिलासा! एका रुग्णाला दिला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

तब्बल ६ महिन्यांनंतर जिल्ह्यात शनिवारी (दि.११) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून अंतराने का होईना मात्र १-२ बाधित भर घालत आहेत. मागील मागील ४-५ दिवसांपासून नवीन बाधितांची भर पडलेली नाही. त्यातच शुक्रवारीही एकही बाधित आढळून आला नाही. त्यातच एका ॲक्टिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याने आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ झाली असून दिलासा मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नवीन बाधितांची भर पडलेली नसतानाच शुक्रवारी (दि.२४) सुद्धा नवीन बाधित आढळून आले नसल्याने दिलासा आहे. त्यातच एका ॲक्टिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून आता जिल्ह्यात २ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. तब्बल ६ महिन्यांनंतर जिल्ह्यात शनिवारी (दि.११) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून अंतराने का होईना मात्र १-२ बाधित भर घालत आहेत. मागील मागील ४-५ दिवसांपासून नवीन बाधितांची भर पडलेली नाही. त्यातच शुक्रवारीही एकही बाधित आढळून आला नाही. त्यातच एका ॲक्टिव्ह रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याने आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २ झाली असून दिलासा मिळाला आहे. असे असले तरीही आता ओमायक्रॉन हा नवा विषाणू धुमाकूळ घालत असून नागपूरपर्यंत पोहचल्याने नागरिकांनी खबरदारीने वागणे गरजेचे आहे. सध्या नागरिक बेभानपणे वागत असून नियमांना डावलताना दिसत आहेत. मात्र आता कोरोनाला पाय पसरू द्यायचे नसल्यास नियमांचे पालन अतिआवश्यक आहे. 

चाचण्यांची संख्या वाढविली - ओमायक्रॉनच्या धर्तीवर चाचण्यांची संख्या वाढविण्याबाबत आदेश असतानाही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या घटून १०० च्या आता आल्याचे दिसत होते. मात्र गुरुवारपासून त्यात वाढ झाल्याचे दिसते. गुरुवारी चाचण्या घेण्यात आल्या असून यात १९७ आरटी-पीसीआर तर ३३ रॅपिड ॲंटिजन चाचण्या होत्या. आतापर्यंत जिल्ह्यात ४७०७३२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

लसीकरण हाच पर्याय- देशात सध्या ओमायक्रॉनची दहशत निर्माण झाली आहे. अशात नागरिकांनी पुन्हा एकदा खबरदारीने वागण्याची गरज आहे. यासाठी नियमांचे पालन करण्यासोबतच लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. कोरोनाची लस व्यक्तीला गंभीर संसर्ग होऊ देत नसल्याने लसीकरण केल्याशिवाय पर्याय नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या