शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

दिलासा...दोन महिन्यांनंतर बाधितांची संख्या दोन अंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या टेस्ट वाढवून देखील रुग्णसंख्येत होत आहे. हे कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सद्य:स्थितीत ३ हजारांवर आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट केल्या जात आहे. मात्र, यानंतर फार कमी प्रमाणात रुग्ण निघत आहेत. ही जिल्हावासीयांसाठी समाधानकारक बाब आहे. 

ठळक मुद्दे२६४ बाधितांची कोरोनावर मात : २९ रुग्णांची नोंद : चार बाधितांचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: मागील मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा ग्राफ वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर सातत्याने कोरोनाचा तीन अंकी पाढा सुरू होता. त्यामुळेच मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात जवळपास १८ हजारांवर रुग्णांची भर पडली आहे. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात झाली आहे, तर रविवारी (दि.२३) दोन महिन्यांच्या कालावधीनंतर रुग्णसंख्या प्रथमच दोन अंकी आली. त्यामुळे जिल्ह्यातून आता निश्चितच कोरोनाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या टेस्ट वाढवून देखील रुग्णसंख्येत होत आहे. हे कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सद्य:स्थितीत ३ हजारांवर आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट केल्या जात आहे. मात्र, यानंतर फार कमी प्रमाणात रुग्ण निघत आहेत. ही जिल्हावासीयांसाठी समाधानकारक बाब आहे. रविवारी जिल्ह्यात २६४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली तर २९ नवीन रुग्णांची नोंद झाली. ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधितांच्या संख्येत घट होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे; पण बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने थोडी चिंता कायम आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १५५२४६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२९९६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १५०६९६ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १२९९५२ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१५७ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३८७७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६६६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ७१५ काेरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ६९० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.  

जिल्ह्याचा रिकव्हरी दर राज्यापेक्षा सरस कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९६.५६ टक्के असून राज्याचा रिकव्हरी दर ९२.०५ टक्के आहे. रिकव्हरी दरात सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 

२८१९ चाचण्या २९ पॉझिटिव्ह कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २२५० रॅपिड अँटिजन टेस्ट तर ५६९ आरटीपीसीआर अशा एकूण २८१९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २९ कोरोनाबाधित आढळले. कोरोनाबाधितांचा पाॅझिटिव्हिटी रेट १.०३ टक्के आहे, तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याने मृत्यूदर १.६२ टक्क्यावर पोहचला आहे. रुग्णसंख्येत घट झाल्याने १३१४ खाटा उपलब्ध जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१५ वर आली आहे. डीसीएच, कोविड केअर सेंटर आणि शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयातील सद्य:स्थितीत एकूण १३१४ खाटा उपलब्ध आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या