शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 21:53 IST

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती समाजाचा उद्धार करी’ असे महिलांबाबत बोलले जाते. कुटूंबाला संस्कारीत करण्याचे कसब महिलांमध्ये असून ती समाजाचा विकासही करून शकते.

ठळक मुद्देकल्पना भेंडारकर : इंझोरी येथील कुणबी समाजाचा हळदीकुंकू कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती समाजाचा उद्धार करी’ असे महिलांबाबत बोलले जाते. कुटूंबाला संस्कारीत करण्याचे कसब महिलांमध्ये असून ती समाजाचा विकासही करून शकते. आजची महिला कर्तबगार आहे. त्यामुळे स्वत:मध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता समाजाची प्रगती साधण्यास महिलांनी चार भिंतीच्या बाहेर येवून समाजाला दिशा देण्यासाठी पुढे यावे असा हितोपदेश सामाजिक कार्यकर्त्या कल्पना भेंडारकर यांनी दिला.अर्जुनी-मोरगाव कुणबी समाज संघटनेच्यावतीने ग्राम इंझोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला उद्योगिका प्रतिभा फुंडे, नगरसेविका येमु ब्राम्हणकर, गीता ब्राम्हणकर, डॉ. मनिषा भेंडारकर, कमला पाऊलझगडे, डॉ. सुधा रहिले, पिंगला ब्राम्हणकर, सरपंच मिनाक्षी रहिले, अलका मेंढे, उपसरपंच दिपीका रहिले, कल्पना भेंडारकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.तत्पूर्वी महिलांना सन्मानाचे, हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मा. जिजाऊ, सरस्वती देवी यांच्या प्रतिमासमोर दिप प्रज्वलन व पुष्पहार घालून अभिवादनासह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ३५ गावांतील महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी भजन व भावगीत गावून महिलांनी आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित सरपंच मिनाक्षी लोकेश तरोणे यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. समाजाची बांधीलकी राहावी, समाज एकसंघ राहावा, समाजाला नवी दिशा मिळून जनजागृती व्हावी, एकमेकाच्या दुखात सहभागी होऊन मदतीसाठी पुढे यावे या विषयावर महिलांमध्ये विचार मंथन झाले.दरम्यान हळदीकुंकू लावून समाजाच्यावतीने उपस्थित महिलांना भेट वस्तु देण्यात आली. संचालन लता मेंढे यांनी केले. प्रास्ताविक कल्पना खोटेले यांनी मांडले. आभार मनिषा तरोणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेडारकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, छगन लोणारे, प्रकाश शिवणकर, रविंद्र खोटेले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी कल्पना भेंडारकर, गायत्री मेंढे, वंदना शिवणकर, लता मेंढे, शामा चुटे यांच्यासह समाजातील महिलांनी सहकार्य केले.