सालेकसा : निवडणूक आयोग व मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जनतेत मतदानाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून सालेकसा शहरात तहसीलदार तहसीलदार गी.ना. खापेकर व प्राचार्य डॉ. एच.बी. चौरसिया यांच्या मार्गदर्शन मतदान जनजागृती रॅली २९ सप्टेबरला काढण्यात आली.या रॅलीची सुरुवात एम.बी. पटेल कॉलेज, वनविभाग कार्यालय, कृषी विभाग कार्यालय, कोआॅपरेटिव्ह बँक, पंचायत समिती, बसस्टॉप, बाजार चौक, गांधी पुतळा, मामा चौक, रेल्वे स्टेशन परिसरातून घोषणा देत नेण्यात आली. यावेळी मतदान मजनागृतीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, घोषणा देत मतदारांना आकर्षित करीत होते. मतदान आमचा हक्काचा मतदान करा लोकशाही टिकवा मतदान विकू नका, १५ आॅक्टोबरला करा मतदान अशा घोषणा देत निवडणुकीची माहिती जनतेला देण्यात आली. या मतदार जनजागृती रॅलीला यशस्वी करण्यासठी नायब तहसीलदार अजय शकुंदरवार, आर.एम. कुंभरे, के.बी. शहारे, प्रा. भगवान साखरे, डॉ. बी.जे. राठोड, प्रा. ममता पालेवार, डॉ. एन.एन. हटवार, डॉ. यु.एम. पवार, डॉ.बी.के. जैन, प्रा. वी.टी. फुंडे, प्रा. अश्विन खांडेकर, प्रा. जोगी, प्रा. इंद्रकला बोपचे, बी.जी. वरखडे, पवन पाथोडे, ग्रंथपाल अरविंद भगत, नामदेव बागडे, प्रकाश गायधने, डेव्हिड मेश्राम, देवेंद्र फरदे व रंजू टेकाम यांनी सहकार्य केले.
महाविद्यालयीन तरुणही जनजागृतीत अग्रेसर
By admin | Updated: October 1, 2014 23:26 IST