शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

जिल्हाधिकाऱ्यांकडूनही हजेरी सहायकांची उपेक्षाच

By admin | Updated: June 28, 2014 01:09 IST

जिल्ह्यात १७ हजेरी सहायक कार्यरत आहेत. त्या विभागात रोहयोचे कामे नसल्याने १ जून २०१४ पासून क्षेत्रीय जिल्हास्तरावरील ...

काचेवानी : जिल्ह्यात १७ हजेरी सहायक कार्यरत आहेत. त्या विभागात रोहयोचे कामे नसल्याने १ जून २०१४ पासून क्षेत्रीय जिल्हास्तरावरील रोहयो प्रभागांतर्गत रोहयो कक्षामध्ये काम देण्याचे शासनाने निर्देश दिल्याने जिल्हाधिकारी (मग्रारोहयो) यांनी कार्यवाही केली. मात्र यात पक्षपात व शिफारशीद्वारे अन्याय करण्यात आल्याचे आरोप हजेरी सहायकांनी केला आहे.हजेरी सहायकांना परवडत नसले तरी शासनाकडून आज ना उद्या न्याय मिळेल या आशेने पदावर राहून त्यांनी काम सोडले नाही. परंतु शासन व प्रशासनानेच त्यांची उपेक्षा केली. २१ वर्षांपासून लढा देत निम्यापेक्षा अधिक सेवानिवृत्त झाले. जे उरले आहेत तेसुद्धा सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी प्रभागांतर्गत रोहयो कक्षामध्ये काम देण्याचे आदेश देताना त्यांच्या अडचणी व वयोमर्यादेकडे मुद्दाम लक्ष दिले नाही, असा आरोप हजेरी सेवकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.गोंदिया तालुक्याच्या पांढराबोडी येथील रहिवाशी कोमल दमाहे (५९) यांचे वेतन पाच हजार ९०० रूपये असून त्यांना सेवानिवृत्त व्हायला फक्त एक वर्ष उरला आहे. त्यांना पंचायत समिती देवरीच्या मग्रारोहयो कक्षात कामावार जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा येथील रहिवाशी रामेश्वर भांडारकर (५९) यांना पंचायत समिती सालेकसा येथील मग्रारोहयो कक्षात काम देण्यात आले आहे. त्यांचा एकूण पगार सहा हजार ९५० रुपये असून सेवानिवृत्तीला एक वर्ष बाकी आहे. गोंदियातील रहिवाशी मेश्राम (५९ वर्षे ९ महिने) त्यांना पंचायत समिती सडक/अर्जुनी येथील मग्रारोहयो कक्षात कामावर पाठविण्यात आले आहे. यांच्या सेवानिवृत्तीला केवळ तीन महिने उरले आहेत.दिलेल्या आदेशावरुन ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अर्थात ज्यांची ओळख आणि शिफारस त्यांना सुविधाजनक प्रभागातील कक्षात काम देण्यात आले आहे. परंतु ज्यांचा कोणीही वाली नाही, अशा हजेरी सहायकांना वयोमानाचा विचार न करता दूरवर असलेल्या प्रभागात पाठविण्यात आले आहे. असा आरोप हजेरी सहायकांच्या कुटुंबीयांनी केला असून नावे जाहीर न करण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले आहे.गावाजवळ शेतात किंवा माती-गोट्यांच्या कामावर जाणाऱ्या मजुराला २०० ते ३०० मजुरी दिली जाते. त्यांच्या महिन्याच्या पगाराचा विचार केला तर ६ ते १० हजार रुपये पडतो. परंतु हजेरी सहायकांचा पगार ५ हजार ९०० पासून ७ हजार रुपये पडतो. हा मोठाच अन्याय आहे. त्यातच हजेरी सहायकांचा अंतरावर रोहयोच्या कक्षात आदेश दिल्याने त्यांची मानसिकता कशी असेल किंवा राहील याचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही, अशीही टिका हजेरी सहायकांच्या कुटुंबीयांनी केली आहे. (वार्ताहर)