शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोच पोजीशनच्या टिष्ट्वटची रेल्वेमंत्र्यांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:21 IST

येथील रेल्वे स्थानकावरील डिस्प्ले बरेदा बंद तर कधी चुकीचा कोच क्रमांक दाखविला जातो. त्यामुळे याचा ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी (दि.१७) येथील रेल्वे स्थानकावर अजमेरी पुरी (१२८४१) या गाडीचे कोच क्रमांक व डिस्प्ले क्रमांक चुकीचे दाखविण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांची धावपळ उडाली.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वे स्थानकावरील डिस्प्ले बरेदा बंद तर कधी चुकीचा कोच क्रमांक दाखविला जातो. त्यामुळे याचा ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी (दि.१७) येथील रेल्वे स्थानकावर अजमेरी पुरी (१२८४१) या गाडीचे कोच क्रमांक व डिस्प्ले क्रमांक चुकीचे दाखविण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांची धावपळ उडाली. दरम्यान गोंदिया येथील प्रवासी पीयूष अग्रवाल यांनी या प्रकाराची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना टिष्ट्वट करून तक्रार केली. त्यांनी लगेच याची दखल दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे विभागाचे डीआरएम बंडोपाध्याय यांना दखल घेण्यास सांगितले.काही लोक सोशल मिडियाचा योग उपयोग करुन घेत असून त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यां देखील वेळीच मार्गी लागत असल्याने सोशल मिडिया त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे रेल्वेसह इतर शासकीय विभागांनी त्यांच्या विभागाशीे निगडीत तक्रारी व त्यांचा फिडबॅक त्यांच्या आॅनलाईन संकेतस्थळावर अथवा टिष्ट्वटर करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा प्रवाशांना सुद्धा फायदा होत आहे. शुक्रवारी (दि.१७) गोंदिया रेल्वे स्थानकावरुन अजमेरी पुरी या गाडीने प्रवासाठी जाणारे येथील पीयूष अग्रवाल हे आपल्या कुटुंबीयांसह रेल्वे स्थानकावर उभे होते. गाडी येण्याच्या दहा ते पंधरा मिनिटापूर्वी डिस्प्लेमध्ये कोच क्रमांक दाखविण्यात आले.त्यानुसार प्रवाशी त्या ठिकाणी जावून उभे राहिले. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांचा समावेश होता. मात्र गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाटावर सदर गाडी पोहोचल्यानंतर डिस्प्लेनुसार कोच लागले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऐनवेळी सामान घेवून धावपळ करावी लागली. सर्वाधिक मनस्ताप ज्येष्ठ नागरिक व महिलांना सहन करावा लागला. त्यामुळे यासर्व प्रकाराची तक्रार व फोटो पीयुष अग्रवाल यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना टिष्ट्वटर टिष्ट्वट करुन केली. दरम्यान या टिष्ट्वटरवरील तक्रारीची रेल्वे मंत्री गोयल यांनी लगेच दखल घेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांना टिष्ट्वट करून लगेच दखल घेण्यास सांगितले. बंडोपाध्याय यांनी सुध्दा टिष्ट्वटरवर दखल घेऊन योग्य कारवाही करण्याचे आश्वासन दिले.बरेचदा डिस्प्लेच नाहीहावडा-मुंबई मार्गावरील सर्वात मोठे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाची ओळख आहे. दिवसभरात या रेल्वे स्थानकावरुन जळपास दीडशेहून अधिक रेल्वे गाड्या धावतात. विशेष म्हणजे हे रेल्वे स्थानक अ श्रेणीत आहे. मात्र रेल्वे स्थानकावरील सोईसुविधांकडे येथील रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. बरेचदा गाड्या आल्यानंतरही डिस्प्ले होत नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी