मरारटोलीतील घटना : तिघांवर गुन्हा दाखलगोंदिया : कापड दुकानात शिरून तिघांनी दुकान मालक व नोकरांना मारहाण करून कापड व रोख चार हजार ३०० रूपये हिसकावून नेले. शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी ५ वाजता दरम्यान रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत मरारटोली येथे ही घटना घडली. बसस्थानकाजवळील लक्की ऊर्फ सुनील मुरजानी (१८) हे आपल्या दुकानातील नोकरांसोबत असताना संदीप करीयार, डॉसू फाडन व त्यांचा एक मित्र अशा तिघांनी दुकानात जाऊन कपडे दाखविण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी लक्की व दुकानातील इतरांना मारहाण केली. तसेच दुकानातील चार शर्ट, चार लोअर, पँट पीस, चार जीन्स, चार रेनकोट, चार कॉलेज बॅग, पाच अंडरवियर असा नऊ हजार रूपयांचा माल व चार हजार ३०० रूपये रोख असा एकूण १३ हजार ३०० रूपयांचा माल पळविला. रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३९४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कापड दुकानदाराला लुटले
By admin | Updated: July 19, 2015 01:30 IST