शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

‘मायनस मार्किंग’ पद्धत बंद करा

By admin | Updated: December 6, 2014 01:52 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षांत आता मायनस मार्किंगची पद्धत सुरू करण्यात आली आहे.

गोंदिया : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षांत आता मायनस मार्किंगची पद्धत सुरू करण्यात आली आहे. याबाबत पूर्व माहिती न देता विद्यार्थ्यांची मायनस मार्कींग करण्यात आल्याने फक्त सहा टक्के निकाल लागला आहे. अशात मायनस मार्किंगची ही पद्धत त्वरीत बंद करण्याची मागणी औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी निवासी उप जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना ४ डिसेंबर रोजी निवेदन दिले. यापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांत मायनस मार्किंगची पद्धत नव्हती. तर प्रथम सत्र परीक्षेपर्यंत ही पद्धत अंमलात नव्हती. आॅगस्ट २०१४ च्या सिलॅबसनुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याच्या प्रश्नपत्रिकेवरही याबाबत नोंद नव्हती. मात्र मायनस मार्किंग करण्यात आली व परिणामी येथील प्रशिक्षण संस्थेचा निकास फक्त सहा टक्के लागला. एकीकडे शासन औद्योगिक प्रशिक्षणाला महत्व देत तरूणांना याकडे वळण्याचे आवाहन करीत आहे. तर दुसरीकडे मायनस मार्किंगचा प्रकार सुरू केला जात आहे.विशेष म्हणजे आठवी पास विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचे प्रशिक्षण घेता येत नसताना शासनाने त्यांना वेल्डर, वायरमन व कारपेंटरचे प्रशिक्षण उपलब्ध करविले. आता त्या आठवी पास विद्यार्थ्यांना मायनस मार्किंग केल्यास त्यांचे प्रशिक्षण पूर्ण कसे होणार असा सवाल येथील विद्यार्थी करीत आहेत. इंजिनियरींग व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात मायनस मार्किंग होत नाही. तसेच आयटीआयचा विद्यार्थी अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत पोहचू शकत नाही. असे असताना मात्र त्यांनाच मायनस मार्किंग सुरू करण्यामागचे शासनाचे धोरण काय ते निश्चित होत नाही. करिता आयटीआयमध्ये सुरू करण्यात आलेली मायनस मार्किंगची ही पद्धत त्वरित बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी सुमारे २०० विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वालस्कर यांना निवेदन दिले. तसेच ही पद्धत त्वरीत बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)