शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दारु दुकान बंद करा महिलांचा मशाल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:57 IST

रिसामा प्रभागातील परवानाधारक दारु दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी गुरूवारी (दि.१) रात्री आमगाव पोलीस स्टेशनवर मशाल मोर्चा काढला. त्यामुळे पोलीस स्टेशनसमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रिसामा प्रभागातील परवानाधारक दारु दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी गुरूवारी (दि.१) रात्री आमगाव पोलीस स्टेशनवर मशाल मोर्चा काढला. त्यामुळे पोलीस स्टेशनसमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करुन दारु दुकान त्वरीत बंद करण्याची मागणी केली.आमगाव येथील रिसामा प्रभागात जुने परवानाधारक देशी दारु दुकान बंद करण्यासाठी महिलांचा मागील काही दिवसांपासून लढा सुरू आहे. या दारु दुकांनामुळे गावातील वातावरण प्रदूषित होत असून अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी जात आहेत. दुकानाच्या परिसरातून जाणाऱ्या मार्गावर महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील अनेक कर्ते पुरूष दारुच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिला आणि नागरिकांनी दारु दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला पत्र लिहून केली. मात्र प्रशासनाने अद्यापही त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे महिलांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्याप्त आहे. सदर दुकान बंद करण्यासाठी महिलांनी यापुर्वीही आंदोलन व उपोषण केले. मात्र यानंतरही प्रशासनाने याकडे काणाडोळा केला आहे.सदर दारु दुकान गुरुवारी (दि.१) दुकान मालकाने सुरु करताच महिलांनी रोष व्यक्त केला. रात्री ८.३० वाजता अरुण बहेकार, सिता ब्राम्हणकर, यशोदा गायधने, तृप्ती बहेकार, लक्ष्मी ब्राम्हणकर, सुमन चुटे, छबुताई उके, संजय बहेकार, तिरथ येटरे, रविदत्त अग्रवाल, रामेश्वर श्यामसुंदर, मेंढे यांच्यासह महिला-पुरुषांनी दारु दुकान कायम बंद करण्याच्या मागणीला घेवून मशाल मोर्चा काढून पोलीस स्टेशनवर धडक दिली. या वेळी महिला-पुरुषांनी सदर दारु दुकान बंद करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची मागणी केली. त्यामुळे काही वेळ पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.