शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पीककर्ज न देणाऱ्या बँकांमधून शासकीय खाते बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

रब्बीतील धान विक्री करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. रब्बीची धान खरेदी मुदत ३० जूनपर्यंतच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच यापुढे उघड्यावर धान खरेदी केली जाणार नसून वखार महामंडळाशी चर्चा करून गुदामे उपलब्ध केली जाणार आहे. 

ठळक मुद्देनवाब मलिक : ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची थकबाकी पंधराव्या वित्त आयोगातून

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून, या बँकेने ७० टक्के, तर राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका दरवर्षी मागे राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा  कमी पीककर्जाचे वाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेले शासकीय कार्यालयांचे बँक खाते बंद करून दुसऱ्या बँकेत उघडण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी (दि.२५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभसुद्धा शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे पथदीप आणि पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल थकल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र ही अडचण दूर करण्यासाठी ग्रामपंचायतींना थकीत वीजबिल भरण्यासाठी १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध करून देण्याचे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे ही समस्यासुद्धा आता दूर होणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खते, बियाणे यांचा बफर स्टॉक उपलब्ध असून, तुटवडा नसल्याचेदेखील पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

रब्बी धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ?रब्बीतील धान विक्री करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. रब्बीची धान खरेदी मुदत ३० जूनपर्यंतच आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भातील प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच यापुढे उघड्यावर धान खरेदी केली जाणार नसून वखार महामंडळाशी चर्चा करून गुदामे उपलब्ध केली जाणार आहे. धानाची उचल न करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाईमागील खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाई करण्यासाठी राइस मिलर्सने करार केले आहेत. पण त्यांनी अद्यापही धानाची उचल केली नसल्याने रब्बीतील धान खरेदी अडचणीत आली आहे. त्यामुळे धानाची उचल न करणाऱ्या राइस मिलर्सवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले. 

लसीकरणाची गती वाढविणारजिल्ह्यात आतापर्यंत ६० वर्षांवरील नागरिकांचे ६० टक्के, ४५ वर्षांवरील नागरिकांचे ५२ टक्के आणि १८ वर्षांवरील नागरिकांचे ५ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाचा भर आहे. शुक्रवारी जिल्ह्याला ३० हजार लसीचे डोस प्राप्त होणार आहे. त्यामुळे लसीकरण माेहिमेची गती वाढविण्यास मदत होणार आहे. 

१५ जुलैपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाजडेल्टा प्लस या आजाराचे रुग्ण महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. लगतच्या मध्य प्रदेश राज्यातसुद्धा या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, तर १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सहा ऑक्सिजन जनरेशन प्लांट, ९०० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर असून, पुन्हा ५०० जम्बो सिलिंडर खरेदी करण्यात येणार आहे. तर सरकारी रुग्णालयात ११०० आणि खासगी रुग्णालयात ९०० असे एकूण दोन हजार बेड सज्ज ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक