शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निवडणुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

सर्वोच्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने जिल्हा परिषद आणि परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाने ओबीसी जागा सर्वसाधारण करून निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून तीन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्यापही अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नव्हता. त्यामुळे निवडून आलेल्या जि. प. सदस्यांच्या अधिकारांचे हनन होते; मात्र मंगळवारी ग्रामविकास विभागाने काढलेल्या पत्रामुळे आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्याच्या ग्रामविकास विभागाने नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पंचायत समिती सभापती, सरपंच व ग्रामपंचायत यांच्या रिक्त असलेल्या जागा सर्वसाधारण करून घेण्याचे निर्देश दिले, तसेच आगामी काळातील नमूद पदांच्या प्रस्तावित निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासंंबंधीचा आदेश ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुनील माळी यांनी मंगळवारी (दि.१२) काढला आहे. त्यामुळे याच पत्राचा संदर्भाने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक होण्याचा मार्गसुद्धा मोकळा झाला असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने जिल्हा परिषद आणि परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाने ओबीसी जागा सर्वसाधारण करून निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर झाला. त्यानंतर पंधरा दिवसात अध्यक्ष आणि सभापतीपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते; मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुका या जुन्या आरक्षणानुसार घ्यायचे की नव्याने आरक्षण काढायचे, असा पेच जिल्हा निवडणूक विभागासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते; मात्र ग्रामविकास विभागाने यावर आपले मत नोंदविण्यासाठी तब्बल तीन महिने लावले. त्यामुळे निवडून आलेले सदस्य त्यांच्या अधिकारापासून वंचित होते; मात्र मंगळवारच्या ग्रामविकास विभागाच्या पत्राने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता निवडणुकीच्या तारखेकडे लक्ष- ग्रामविकास विभागाच्या पत्रानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आठपैकी दोन पंचायत समितीचे आरक्षण हे नामाप्र निघाले होते. त्यामुळे सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार नामाप्र जागा सर्वसाधारण केल्या जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जि.प.अध्यक्ष आणि सभापतीपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती आहे.सदस्य अजूनही संभ्रमात- ग्रामविकास विभागाने मंगळवारी काढलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक होणार की नाही, याबाबत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे; मात्र या निर्णयानुसार निवडणूक घेता येणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक- जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सदस्य न्यायालयात- जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक मागील तीन महिन्यांपासून लांबणीवर गेल्याने या विरोधात भाजपच्या २६ सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषद