शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत गोंदिया रेल्वेस्थानक ८३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:38 IST

रेल्वे स्थानकाने स्वच्छतेबाबत आपल्या रेटिंगमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. सन २०१६ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग संपूर्ण देशातील स्थानकांमध्ये १८९ होती.

ठळक मुद्देवर्षभरात विविध सुधारणा : मागील वर्षाच्या तुलनेत घेतली भरारी

आॅनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे स्थानकाने स्वच्छतेबाबत आपल्या रेटिंगमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. सन २०१६ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग संपूर्ण देशातील स्थानकांमध्ये १८९ होती. परंतु सन २०१७ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग ८३ झालेली आहे. केवळ एका वर्षात गोंदिया रेल्वे स्थानकाने रेटिंगमध्ये १८९ वरुन ८३ व्या स्थानावर भर घेतली आहे.हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाची ओळख आहे. मागील वर्षभरात रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे स्थानकावर विविध उपाय योजना केल्या. रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेवर अधिक भर दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या रेटिंगमध्ये रेल्वे स्थानकाने चांगली प्रगती केली आहे. मुंबई ते हावडापर्यंत प्रवास करणाºया प्रवाशांना नेहमीच गोंदिया रेल्वे स्थानकातील स्वच्छता व्यवस्था आवडते. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या स्वच्छता अभियान रेल्वेची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.वरिष्ठ अधिकाºयांच्या निर्देश आणि निरीक्षणामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्वच्छतेच्या बाबतीत कायापालट झाला आहे.परिणामी गोंदिया रेल्वे स्थानकावर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे अधिकारीसुद्धा विशेष लक्ष देत आहेत.गोंदिया रेल्वे स्थानकाकडून आता वरिष्ठ अधिकाºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच आता रेल्वे स्थानकाच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी ७९ कर्मचाºयांच्या नियुक्तीची निविदा ६ डिसेंबरला काढण्यात येणार आहे. श्रीनिवास हॉस्पिटलिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट प्रा.लि. नागपूरला सदर टेंडर देण्यात आले आहे.आधी केवळ ३४ कर्मचारी असतानाही गोंदिया रेल्वे स्थानकाने ८३ व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने देखील आता येथील स्वच्छताविषयक कामाकरिता असलेल्या कर्मचाºयांच्या संख्येत दुप्पट वाढ केली आहे.रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात वाढगोंदिया रेल्वे स्थानकावर दररोज शंभरावर प्रवासी गाड्या धावतात. या स्थानकावरुन प्रवास करणाºया प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आॅक्टोबर महिन्यापर्यंत १० कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ झाल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.