लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : येथील नगरपंचायतचे १८ सफाई कामगार मंगळवारपासून (दि.८) उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसले आहेत.नगरपंचायत निर्मितीच्या पूर्वीपासून अनेक सफाई कामगार शहरातील घनकचरा संकलनाचे काम करीत आहेत. आजतागायत त्यांना रोजंदारी दिली जात होती. परंतु १ जुलैपासून घनकचरा संकलनाचे कंत्राट देण्यात आले. हे कंत्राट सफाई कामगारांना मान्य नाही. हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून काम करीत असून त्यांची नमूना २२ वर नोंद आहे. मात्र या कामगारांचे अद्यापही समायोजन करण्यात आले नाही. सध्या कंत्राट देऊन हे काम करुन घेण्यात येत असल्यामुळे कामगारांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.१ जुलैपासून हे कामगार नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात जातात तेव्हा त्यांना हाकलून लावले जाते. या अन्यायाविरोधात सफाई कामगारांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत कंत्राटदारामार्फत घनकचरा संकलनाचे कार्य सुरु आहे. या उपोषणाला तालुका शिवसेनाने पाठींबा दर्शविला आहे.उपोषणकर्त्यात रामु कुठारे, मुकेश पर्वते, दुधराम देशमुख, रमेश कुंभरे, नैवसाय साखरे, विजय मडावी, पुंडलिक गायकवाड, दामोधर चौधरी, सुधाकर वलथरे, प्रमोद लाडे, शामराव कोहरे, आसाराम किरसान, एकनाथ टेंभुर्णे, उद्धव वावरे, भाऊराव मेश्राम, राधेलाल भंडारी, गोविंदा गजभिये यांचा समावेश आहे.
सफाई कामगार आमरण उपोषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:40 IST
येथील नगरपंचायतचे १८ सफाई कामगार मंगळवारपासून (दि.८) उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसले आहेत. नगरपंचायत निर्मितीच्या पूर्वीपासून अनेक सफाई कामगार शहरातील घनकचरा संकलनाचे काम करीत आहेत. आजतागायत त्यांना रोजंदारी दिली जात होती.
सफाई कामगार आमरण उपोषणावर
ठळक मुद्देघनकचरा संकलन कंत्राटाचा विरोध : १८ सफाई कामगार उतरले आंदोलनात