शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 9, 2014 23:43 IST

तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या

सालेकसा : तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन  १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या लोकांत कमालीचा संताप पसरला आहे. विद्युत कार्यालयात वारंवार निवेदन करूनसुद्धा भारनियमनाबद्दल एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे.कावराबांध येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रामार्फत कावराबांध, झालिया, धानोली, नवेगाव, सोनपुरी परिसरात विद्युत पूरवठा करण्यात येते. परिसरातील गावांना वेगवेगळ्या फिडरमध्ये विभाजित करण्यात आले असून त्या फिडरअंतर्गत एकूण गावाची वीज खपत व त्यानुसार रक्कम वसुलीचे प्रमाण पाहून भारनियमन ठरविले जाते. ग्रामीण भागामध्ये अनेक लोक असे आहेत की ते नियमानुसार मीटर न लावता रोज आकडा टाकून वीज चोरी करतात. तसेच चोरीच्या विजेद्वारे अनेक विद्युतवर चालणार्‍या सोयीसुविधांचा उपयोग करतात. तर काही प्रामाणिक ग्राहक नियमानुसार मीटर लावून वीज वापर करतात. परंतु वीज चोरीचा परिणाम मीटर धारकांवर पडतो व त्यांना अधिक रक्कम भरावी लागते. काही गावात मीटर कमी असून वीज जास्त खपत केली जाते. परंतु काही गावात मीटरचे प्रमाण जास्त असून विजेची खपत कमी होते. परंतु फिडरमध्ये विभागणी केल्याने अशा दोन्ही गावांना एकाच पारड्यात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नियमित ग्राहकांनासुद्धा भारनियमनाचा जबरदस्त फटका बसत आहे. कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत पाच वॉर्डाचा समावेश असून पाच टोल्यांचा येथे समावेश करण्यात आला आहे. परंतु कावराबांधच्या वॉर्ड- १ आणि २, कावराबांध, मोहाटोला येथे एकही भारनियमन नाही तर वॉर्ड- ३, ४ व ५ मध्ये कुणबीटोला, गोवारीटोला, ब्राम्हणटोला येथे दररोज फक्त अडीच तास वीज पूरवठा होत असून दिवसभर ९ ते १0 तास भारनियमन सुरू आहे. त्यामुळे गोवारीटोला येथील नागरिक, दुकानदार, कारखानदार, व्यापारी, लघू व्यावसायीक खूपच त्रस्त झाले आहेत. सध्या सर्वत्र संगणकाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे आता सामान्य लोकांचे, व्यावसायिकांचे, कर्मचारी वर्गांंंचे किंवा कार्यालयांचे काम विद्युतअभावी होवू शकत नाही. एखाद्या महत्वाच्या दिवशी लोक भारनियमन बंद करण्याची विनवणी करुनसुद्धा काही तासासाठीसुद्धा भारनियमन थांबविण्यात येत नाही. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात मतदानाच्या दिवशी व मतगणनेच्या दिवशीसुद्धा भारनियमन सुरुच ठेवण्यात आले होते. त्यामुळे सामान्य मानसापासून अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणा व निर्दयीपणामुळे कावराबांध, सोनपुरी, नवेगाव परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. सध्या जून महिना सुरू असून तापमान वाढला आहे. त्यामुळे  प्रचंड उकाळा सुरू आहे. अशात विद्युत भारनियमन होत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. लोकांचा राग अनावर झाल्यास अनर्थ घडण्यास वेळ लागणार नाही. भारनियमन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)