शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोडले रेल्वेसाठी अन् मिळाले शहराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:23 IST

येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली.

ठळक मुद्देपुजारीटोला जलाशयाचे पाणी : पाणी टंचाईवर उपाय योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली. एकंदरीत सोडले रेल्वेसाठी आणि मिळाले शहराला असे चित्र निर्माण झाले.येथील रेल्वे स्थानकाला बिरसोला जवळील बाघ नदीतून पाणी पुरवठा होतो. तर शहराला बिरसोला पासून सुमारे २० किमी. अंतरावरील डांर्गोली येथून पाणी पुरवठा होतो. बिरसोला येथे बाघ व वैनगंगा नदीचे संगम असून पुढे बाघ नदी वैनगंगाच्या नावाने ओळखली जाते. रखरखत्या उन्हामुळे सध्या बाघ नदी आटली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. अशात पुजारीटोला प्रकल्पातून बिरसोलासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी बिरसोला येथे पोहचते. हेच पाणी पुढे डांर्गोलीपर्यंत जात असल्याची माहिती आहे. डांर्गोली जवळील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून येथूनच १७ किमी अंतरावरील गोंदिया शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीचे पात्र यंदा मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. यावर मात करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने सिंचन विभागाच्या मदतीने शहरापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणी टंचाईवर मात केली. पुजारीटोला प्रकल्पातून आतापर्यंत दोन वेळा डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा १ जून रोजी सकाळी ८ वाजता तिसऱ्यांदा पाणी सोडले जाणार होते. मात्र डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आता तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले आहे.गुरूवारी (दि.३०) डांर्गोली जवळील वैनगंगा नदीतील विहिरीत १०० सेमी पाणी उरले होते. मात्र शुक्रवारी (दि.३१) सकाळी पाण्याची पातळी पाहली असता १३२ सेमी पाणी त्यात होते. एका दिवसात ३२ सेमी पाणी वाढल्याने हे पाणी बिरसोला येथून आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच आता आणखी पातळी वाढण्याचा अंदाज आहे.१ जूनपासून पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बिसेन यांना सांगीतले होते. मात्र आता पाच-सहा दिवस पुरेल ऐवढा पाणीसाठा असल्याने पुजारीटोलाचे पाणी सोडू नये असे सिंचन विभागाला कळविले आहे.-राजेंद्र मडके,उप विभागीय अभियंता, मजिप्रा, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई